महाराष्ट्र

उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला…

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात सकाळी शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केला. यात परसराम जिजाबा गुंजाळ (वय 43) हे जखमी झाले आहे.

परसराम गुंजाळ हे शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते. ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. जखमी परसराम गुंजाळ यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनक्षेत्रपाल लोंडे, श्रीमती कोंढार, कोळी, यादव यांनी ग्रामीण रुग्णालयात येवून जखमीची विचारपूस केली. परसराम गुंजाळ यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येवून त्यांना पुढील उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

11 तास ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

12 तास ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

2 दिवस ago

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या…

2 दिवस ago

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान…

2 दिवस ago