मुख्य बातम्या

करंदीकरांनी अनुभवला रात्रीचा संशयित चोरट्यांचा थरार

संशयितांच्या केलेल्या पाठलागातील अपघातात एकाचा मृत्यू दोघे गंभीर

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे रात्री दीड वाजता दिसलेल्या संशयित युवकांचा पाठलाग करत असताना झालेल्या अपघातात एक युवक मयत तर दोघे गंभीर जखमी झाले असून यामध्ये दोघे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन युवक एका दुचाकीवरुन काही संशयित युवक जातान दिसले यावेळी गावातील काही युवकांनी त्यांचा एम एच १२ यु सि ४३५८ या स्विफ्ट कार मधून पाठलाग सुरु केला. त्यावेळी काही अंतर गेल्यानंतर सदर युवकांचा अपघात होऊन तिघे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, पोलीस हवालदार शंकर साळुंके, श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक रोहिदास पारखे, पोलीस पाटील वंदना साबळे, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत येथील सोनू फिरोज गुडदावत, राजपाल कांतीलाल शेरावत व मंगल बजरंग नानावत या तिघांना येथील मिलिंद ढोकले, वैभव ढोकले, गौरव ढोकले, किरण ढोकले, आकाश ढोकले, गोरक्ष ढोकले, शंकर जांभळकर यांच्या मदतीने शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले.

मात्र यापैकी राजपाल कांतीलाल शेरावत रा. शेरेवस्ती धानोरे ता. शिरुर जि. पुणे या युवकाचा मृत्यू झाला तर सोनू फिरोज गुडदावत रा. भुजबळ वस्ती सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे व मंगल बजरंग नानावत रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.

याबाबत करंदीच्या पोलीस पाटील वंदना महेश साबळे (वय ४2) रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई नीरज पिसाळ हे करत आहे.

मयत युवकासह एक सराईत गुन्हेगार…

करंदी (ता. शिरुर) येथील घडलेल्या घटनेतील राजपाल शेरावत हा एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तो फरार होता. तसेच मंगल नानावत जा देखील काही गुन्ह्यातील आरोपी असल्याने या प्रकारातील दोघे सराईत गुन्हेगार असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

4 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

4 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

6 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

22 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago