पुणे जिल्ह्यातील युवकांनी उभारली वन्य जीव सामाजिक संस्था
शिक्रापूर (शेरखान शेख): सर्पमित्र हे सापांपासून मानवाच्या रक्षणासह सापांच्या रक्षणाचे आदर्श काम करत असतात मात्र सर्पमित्रांनी कायद्याच्या अधीन राहून काम करावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध ज्येष्ठ सर्प अभ्यासक निलीमकुमार खैरे यांनी केले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांच्या पुढाकाराने नुकतीच वन्य जीवांच्या रक्षणासाठी निसर्ग वन्य जीव सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली. त्या संस्थेच्या अनावरण प्रसंगी सर्पमित्रांना मार्गदर्शन करताना प्रसिद्ध ज्येष्ठ सर्प अभ्यासक निलीमकुमार खैरे बोलत होते.
यावेळी निसर्ग वन्य जीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे, संचालक अलताब सय्यद, राहुल तिकूटे, दिपक बनसोडे, साईदास कुसाळ, रमेश हरिहर, अभिजित वाघमारे, गणेश माटे, नरेश बावीसकर, नितीन शेरकर, अमोल कुसाळकर, विजय पडघन, शुभम मोरे, हेमंत परदेशी, सतीश भवाळ, साक्षी कांबळे यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वन्य जीवांच्या बाबतचा कायदा कडक झालेला असून सर्वांनी कायद्याचे पालन करावे, वेळोवेळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच ज्येष्ठ सर्पमित्रांचे मार्गदर्शन घ्यावे, वन्य जीवांचे रक्षण करत असताना त्या वन्य पशु पक्षांना त्रास होणार नाही याची देखील काळजी घेत प्रत्येकाने स्वतःची सुद्धा विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन देखील ज्येष्ठ सर्प अभ्यासक निलीमकुमार खैरे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निसर्ग वन्य जीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांनी केले तर सचिव अमर गोडांबे यांनी सर्वांचे आभार मानले.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…