मुख्य बातम्या

कारेगावच्या उद्योजिका अश्विनी जाधव महिला दिनानिमित्त वुमन स्टार रायझिंग अवार्डने सन्मानित

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार): दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आणि कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार (दि १०) मार्च रोजी नाशिक येथे वुमन स्टार रायझिंग अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कारेगाव येथील उद्योजिका अश्विनी रोहिदास जाधव यांचा वुमन स्टार रायझिंग ब्युटीशियन अवॉर्ड 2024 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन नाशिकच्या कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा संकुलामधील पालाश सभागृहात संपन्न झालेला हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरण व महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा वुमन स्टार रायझिंग अवॉर्ड या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला ग्राहक रक्षक समितीचे राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. आशा पाटील, नाळ चित्रपटाच्या लोकप्रिय अभिनेत्री देविका दप्तरदार, मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०२४ च्या विजेत्या ज्योती शिंदे, सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. शशी अहिरे, कलासाई पैठणीच्या संचालिका अश्विनी शिंदे, मंत्राज ग्रीन रिसर्च लि. चे अध्यक्ष डॉ. यु. के. शर्मा, सामाजिक कार्यकर्ते व पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड मंगेश नेने, लोकप्रिय जादूगर व डॉ. पल्लवी कासलीवाल आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक डॉ. महेंद्र देशपांडे सुत्रसंचालन भावना कुलकर्णी, तर आभार कृतिका मराठी यांनी मानले.

गृहिणी ते पुरस्कार विजेती उद्योजिका…

कारेगाव येथील अश्विनी रोहिदास जाधव या गेले पाच वर्षे ब्युटीपार्लर व्यवसायात काम करत असुन त्यांचं तीन वर्षांपासुन कारेगाव येथील हनुमान मंदिराच्या जवळ ग्रामपंचायतच्या गाळ्यात AJ पार्लर या नावाने व्यवसाय चालु आहे. त्यांना वुमन स्टार रायझिंग ब्युटीशियन अवॉर्ड 2024 चा पुरस्कार मिळाला. अश्विनी यांनी अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत स्वतःचा पार्लर व्यवसाय उभा केला आहे. त्यासाठी त्यांना कुटुंबियांपैकी आई सुरेखा शिंदे, वडील रामदास शिंदे, भाऊ सागर शिंदे तसेच कारेगावच्या सामाजिक कार्यकर्त्यां मिना गवारे यांचा कायमच पाठिंबा मिळाला असल्याचे अश्विनी जाधव यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

17 तास ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

22 तास ago

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

2 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

3 दिवस ago

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कोणत्याही सोसायटीची अर्थिक वसुली साधारणतः जून महिन्यात पुर्ण होत असती ,…

3 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसीत कंपनीचे गोदाम जळून खाक

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील…

3 दिवस ago