मुख्य बातम्या

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव याला पाबळ येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील दुसरा आरोपी आणि वाहनचालक पवन सुरेश हुंडारे अद्याप फरार असल्याने तपासातील आव्हान कायम आहे. एका आरोपीला अटक झाली असली, तरी दुसरा आरोपी पोलिसांच्या हाती कधी लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

गोळीबार करणाऱ्याला अटक; तपासाला गती मिळणार…?

कारेगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी पाच आरोपी अटक केले होते. परंतु गोळीबार करणारे मुख्य दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु होता. या तपासादरम्यान पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव याला पाबळ येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आता आरोपीच्या चौकशीतून गुन्ह्याशी संबंधित आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

एक आरोपी जेरबंद, दुसऱ्याचा शोध सुरुच…

गोळीबार करुन हत्याकांडासारख्या गंभीर प्रकरणात एका आरोपीला अटक झाली असली, तरी दुसरा आरोपी पवन सुरेश हुंडारे अद्याप फरार आहे. त्यामुळे त्याला शोधून काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. फरार आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती रांजणगावचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली. मात्र, त्याच्या अटकेबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिकांचे लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

गोळीबारानंतर नवले कुटुंबीय भयभीत; सुरक्षिततेची हमी कोण देणार…?

या घटनेनंतर विकास नवले आणि त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी आणि कुटुंबीयांना सुरक्षिततेचा विश्वास देण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी कारेगाव ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, तसेच नवले कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी फरार राहिल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष…

पृथ्वी ऊर्फ भैय्या जाधव याच्या अटकेनंतर तपासात कोणते धागेदोरे मिळतात आणि फरार पवन हुंडारेला कधी अटक होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

7 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

7 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

8 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

8 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

8 तास ago

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदतीची मागणी; सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…

9 तास ago