Shirur Police Station
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरात घुसलेल्या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेश छाजेड (वय ४२) यांच्या पायावर गोळी झाडून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, या जीवघेण्या प्रसंगात अवघ्या १२ वर्षांच्या मानवी छाजेड हिने दाखवलेल्या धाडसाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. वडील संकटात असल्याचे पाहताच ती त्यांच्या मदतीला धावली आणि चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंद सोसायटीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पहाटेच्या अंधारात चोरट्याचा धुमाकूळ…
संशयित चोरटा रात्री अडीच वाजल्यापासून आनंद सोसायटी परिसरात फिरत होता. त्याने तीन ते चार बंगल्यांची रेकी करून चोरीचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उमेश छाजेड हे आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवून घरी परतले. घराचा दरवाजा उघडून आत जात असताना त्यांना घरात एक अज्ञात चोरटा दबा धरून बसल्याचे दिसले. अचानक समोर आलेल्या या प्रकारामुळे छाजेड यांनी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांमध्ये झटापट सुरू झाली.
वडिलांच्या मदतीला धावली १२ वर्षांची मानवी…
वडिलांचा जीव धोक्यात असल्याचे पाहताच मानवी छाजेड ही चिमुरडी घाबरून मागे हटली नाही. तिने तातडीने वडिलांच्या मदतीला धाव घेत चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न केला. बाप-लेकीचा प्रतिकार वाढत असल्याचे पाहून चोरट्याने पिस्तूल बाहेर काढले आणि उमेश छाजेड यांच्या पायावर गोळी झाडली. गोळी लागल्याने छाजेड जखमी होऊन खाली कोसळले. त्यानंतर चोरट्याने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. जखमी छाजेड यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वडिलांना वाचवण्यासाठी संकटाचा सामना करणाऱ्या मानवीच्या धाडसाची परिसरात चर्चा सुरू आहे. मात्र, सशस्त्र गुन्हेगाराला रोखण्याचा प्रयत्न करताना स्वतःचा जीव धोक्यात घालणे किती गंभीर ठरू शकते, याचीही या घटनेने जाणीव करून दिली आहे.
चोरीच्या दुचाकीवरून आला; दुसऱ्या दिवशीही पिस्तुलाचा धाक…?
या घटनेतील संशयित चोरटा १३ ऑक्टोबरच्या रात्री खारे मळा परिसरातून चोरीला गेलेल्या महेश कोठारी यांच्या मोटारसायकलवरून आल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, १५ ऑक्टोबर रोजी याच मोटारसायकलवरून आलेल्या संशयिताने एका महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याची घटनाही घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनांमधील संशयित एकच आहे का, यासह त्याच्या गुन्हेगारी हालचालींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे आनंद सोसायटीतील गोळीबाराच्या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
सीसीटीव्हीत संशयित कैद; पोलिसांची शोधमोहीम
आनंद सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संशयित आरोपीच्या हालचाली कैद झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, पहाटे चारच्या सुमारास पोलिसांचे गस्त पथक या भागातून गेले असतानाच ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. वर्षभरापूर्वीही या भागात चोरीची मोठी घटना घडली होती.
घटनेची माहिती मिळताच शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढण्याचे काम सुरू आहे. आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून, नाकाबंदीही करण्यात आली आहे.
पोलिसांकडून आरोपीला पकडण्यासाठी कसून तपास
उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गंभीर असून संशयित आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आरोपीने वापरलेली मोटारसायकल चोरीची असल्याची प्राथमिक माहिती असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके कार्यरत आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले की, घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. संशयिताच्या हालचालींचा माग काढून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, शिरूर शहरातील रात्रीची गस्त अधिक कडक करण्यात आली आहे.
सुरक्षित वस्तीतील गोळीबाराने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शिरुरमधील आनंद सोसायटीसारख्या वस्तीमध्ये घरात घुसून सशस्त्र चोरट्याने गोळीबार केल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. चोरी, रेकी आणि पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावण्याच्या घटनांची साखळी असल्यास ती वेळीच उघड होणे गरजेचे आहे. आता पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे सीसीटीव्हीत कैद झालेल्या संशयिताला तातडीने जेरबंद करणे आणि या घटनांमागील संपूर्ण साखळी उघड करणे. आनंद सोसायटीतील या पहाटेच्या थराराचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि संशयित आरोपी कधी पोलिसांच्या ताब्यात येतो, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.
Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…
कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार
शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात
Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…
शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…