मुख्य बातम्या

मंगलदास बांदलांनी घेतली पार्थ पवार ची भेट

शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी मध्ये संभ्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पक्षातून हकालपट्टी झालेली असून सध्या बांदल कोणत्याही पक्षात नसताना त्यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भेट घेतल्याने शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल झाले असल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले होते, मात्र बांदल हे वीस महिन्यांहून अधिक काळ कारागृहात राहिले असता ते नुकतेच बाहेर आले असून त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात देखील केली आहे. मात्र बांदल यांनी अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश केला नसून पक्षाबाबत कोणतीही भूमिका त्यांनी जाहीर केलेली नाही, बांदल शिरुर तालुक्यातील राजकारणात नेहमी आमदार अशोक पवार यांच्या विरोधात राहिलेले असून त्याबाबत अनेकदा उघड वाच्यता सुद्धा त्यांनी केलेली आहे.

बांदल कोणत्याही पक्षात नसताना सर्व पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात ते असून मागील आठवड्यात बांदल यांचे पुतणे निखील बांदल यांनी शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाजी आमदार पोपटराव गावडे यांनी भेट घेतल्याने खळबळ उडाली होती. मात्र आता मंगलदास बांदल यांनी नुकतेच पुणे जिल्ह्यातील जिजामाता सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी स्वतः सह पत्नी रेखा बांदल व भावाच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून आता थेट विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भेट घेत दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाल्याने खळबळ उडाली असून बांदल यांच्या डोक्यात चालले तरी काय, असा प्रश्न सर्वांना पडला असून पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संभ्रम निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीचे अनेक वरिष्ठ नेते माझे चांगले मित्र असून पार्थ पवार हे देखील माझे चांगले मित्र असल्याने मी त्यांची भेट घेतली. आमच्यात शिरुर लोकसभा मतदार संघाबाबत राजकीय चर्चा झालेली असल्याचे मंगलदास बांदल यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

3 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

3 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

4 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

9 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

9 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

9 तास ago