शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील पद्मावती वस्ती येथे विद्युत रोहीत्राचा धक्का लागून एका मोराचा मृत्यू झाला असून वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोराचा पंचनामा करत शवविच्छेदन करत दहन करण्यात आले आहे.
पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील पद्मावती वस्ती येथील सुनील धुमाळ हे आज सकाळच्या सुमारास शेतात गेले असताना शेतातील विद्युत रोहित्राजवळ एक मोर पडलेला त्यांना दिसला. याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळताच वनरक्षक बबन दहातोंडे, अभिजित सातपुते यांच्या माध्यमातून वनमजूर आनंदा हरगुडे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता विजेच्या धक्क्याने मोराचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
यावेळी राजेंद्र धुमाळ, संदीप धुमाळ, तुषार धुमाळ, सुनील धुमाळ यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान वनविभागाने सदर मोराचा पंचनामा करत त्याला ताब्यात घेत शवविच्छेदन करत मोराचे दहन केले आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…