शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरीकांची विविध कामे प्रलंबित आहे. परंतु हि कामे उशिरा का होईना करत असताना एक ‘विनय ‘शील निवासी नायब तहसिलदार फाईलवर सह्या करताना चक्क खुलेआम पैशाची मागणी करत आहे. शिरुर तालुक्यातील नागरीकांना लुटण्याचे काम या अधिकाऱ्याने सुरु केले असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सर्वसामान्य नागरीकांनी पैसे दिले नाहीतर फाईल तपासुन त्रुटी काढण्याची धमकी देत हा ‘विनय ‘शील निवासी नायब तहसिलदार देत आहे. त्यामुळे त्याच्याकडे प्रलंबित असलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे .या आधीच दोन महिन्यापुर्वी या कार्यालयात लाचेच्या मागणीसाठी एका कर्मचाऱ्यावर लाचलुचपतची कारवाई (Trap) झालेली असताना पैशाची हाव या कार्यालयातील या अधिकाऱ्याकडून सुटत नसल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे.
शिरुर तहसीलदार कार्यालय यापूर्वी तत्कालीन तहसीलदार भ्रष्टाचाराच्या घटनांमुळे बदनाम झालेले होते.तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी अपुऱ्या कर्मचाऱ्यांकडुन नागरीकांची अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. त्याचबरोबर शेत रस्ते, पानंद रस्ते खुले करण्यासाठी पुढाकार घेऊन ते अहोरात्र सर्वसामान्य लोकांची काम करत आहेत. परंतु त्यांच्याच कार्यालयातील एका निवासी नायब तहसीलदाराकडुन त्याला खोडा घालण्याचे काम सुरु असुन या विनय ‘शील अधिकाऱ्याने अनेक नागरिकांना लुटल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे. हे प्रकार त्वरित थांबले नाही तर सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
(क्रमश:)
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…