मुख्य बातम्या

शिरुर नगरपरिषदेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका…

घनकचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणामुळे कारवाईचा इशारा

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरीषदेच्या घनकचरा व्यवस्थापनातील वायुप्रदुषण व गंभीर त्रुटींवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने (MPCB) आता कडक भूमिका घेतली आहे. शहरातील वायु प्रदुषणाच्या वाढत्या तक्रारींमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) नगरपरिषदेवर कठोर निर्देश जारी केले असुन १५ दिवसांत उपाययोजना न केल्यास कायदेशीर कारवाई होईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) तपासणीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरुर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे शिरुर तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड व मनसेचे सचिव रवि लेंडे यांनी २७ जानेवारी २०२५ रोजी म्युनिसिपल सॉलिड वेस्ट (MSW) साइटवरील प्रदुषणाच्या तक्रारी नोंदवल्या. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत दि २८ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ (MPCB) अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या. त्यामध्ये कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन नाही. अवैज्ञानिक पद्धतीने कचरा टाकला जात आहे. काही ठिकाणी घनकचऱ्याचे जाळणे सुरुच आहे. वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तर नगरपरिषदेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची अंतिम संधी…

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) प्रादेशिक अधिकारी जे एस साळुंखे यांनी शिरुर नगरपरिषदेला १५ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत नगरपरिषदेकडून योग्य घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवली नाही तर पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि हवेचे प्रदुषण प्रतिबंधक कायदा १९८१ अंतर्गत कडक कारवाई केली जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.

शिरुर शहरातील वाढते प्रदुषण अन नागरिकांचा संताप…

शहरातील वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिरुरवासीयांनी नगरपरिषदेच्या निष्काळजी कारभाराचा निषेध करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या संपुर्ण प्रकारामुळे शिरुर नगरपरीषदेच्या वायुप्रदुषणाची महाराष्ट्रभर चर्चा सुरु झाली आहे. स्थानिक प्रशासनाची उदासीनता आणि नियमांकडे केलेले दुर्लक्ष संपुर्ण राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. आता नगरपरिषद महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आदेशांचे पालन करते की नाही. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिरुर नगरपरिषदेने वेळीच सुधारणा करावी, अन्यथा मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल!असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे एस साळुंखे यांनी शिरुर नगरपरिषदेला पत्राद्वारे कळवले आहे. त्या संदर्भात मनसेने शिरुर येथे पत्रकार परिषद घेऊन या सर्व बाबी जनतेसमोर आणल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

10 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago