मुख्य बातम्या

‘रांजणगाव मॅरेथॉन’ च्या बुकिंगसाठी उरले फक्त आठ दिवस

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात ‘रांजणगाव मॅरेथॉन’ ने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच या स्पर्धेत दरवर्षी हजारो स्पर्धक सहभागी होऊन आरोग्यदायी जीवन जगण्याचा संदेश देतात. यावर्षीही या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु असून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आता फक्त आठ दिवसांची मुदत राहिली असुन जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले असुन या स्पर्धेसाठी मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते श्रेयस तळपदे हे उपस्थित राहणार आहेत.

शिरुर मध्ये धावपटूंसाठी उत्तम दर्जाची मॅरेथॉन होत नव्हती. ही उणीव २०१८ पासून भरुन निघाली असुन गेल्या पाच वर्षांपासुन ‘आर एम धारीवाल फाउंडेशन’ शिरुरकरांच्या सहकार्याने ‘रांजणगाव मॅरेथॉन’ अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने भरवत असुन २०१९ मध्येही या स्पर्धेस वाढता प्रतिसाद मिळाला. परंतु कोरोना काळात दोन वर्ष हि स्पर्धा घेता आली नाही. सन 2018 आणि 2019या दोन्ही स्पर्धांच्या आयोजनात मला सहभाग घेता आला असे ‘महागणपती फाउंडेशन’ चे अध्यक्ष सागर पाचुंदकर यांनी सांगितले.

यावर्षीही 11 डिसेंबर 2022 रोजी रांजणगाव गणपती येथे सकाळी 6 वाजल्यापासून या मॅरेथॉनला सुरवात होणार आहे. या स्पर्धेविषयी शिरुरकरांमध्ये मोठी उत्सुकता असुन स्पर्धेत यंदाही हजारोंच्या संख्येने स्पर्धक उपस्थित राहतील असा आम्हाला विश्वास आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. ही स्पर्धा शिरुरकरांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी शिरुर तालुक्यातील नागरिक उपस्थित राहतील अशी खास व्यवस्थाही करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनानंतर आरोग्याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली असुन शिरुरकरांनी मोठया धीराने कोरोनाचा सामना केला आहे. दोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत असल्याने धावपटूंसाठी ती मेजवानी ठरणार आहे. या स्पर्धेसाठी आर ‘महागणपती फाउंडेशन’ यांचेही सहकार्य राहणार आहे. शिरुर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार असुन रांजणगाव MIDC पोलिसांचेही याकामी मोठे सहकार्य होणार आहे. हि सर्वसमावेशक स्पर्धा असल्याने या स्पर्धेत शिरुर तालुक्यातील सर्व नागरीकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहील, असा विश्वास शोभाताई धारीवाल यांनी व्यक्त केला.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 9595689696 आणि 9657663383 या नंबरवर संपर्क करावा. तसेच Online Registration साठी https://www.townscript.com/e/ranjangaon-marathon-2022-234204 या लिंकवर क्लिक करा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…

5 तास ago

‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…

6 तास ago

खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…

6 तास ago

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

22 तास ago

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

22 तास ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

22 तास ago