न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत एकूण ९ हजार २८० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. करडे येथे गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध, तर मांडवगण फराटा येथे विनापरवाना मद्य विक्री केल्याप्रकरणी एका पुरुषाविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमुळे अवैध दारु विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मांडवगण फराटा येथे ६७ बाटल्या जप्त…
पहिली कारवाई मांडवगण फराटा ते वडगाव रासाई डांबरी रस्त्यालगत असलेल्या ‘हॉटेल जल्लोष’ येथील पत्राशेडच्या आडोशाला २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास करण्यात आली.मनोहर देवराम इथापे (वय ५०, रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर) हा विनापरवाना मद्यसाठा बाळगून परिचित व्यक्तींना विक्री करताना आढळला. त्याच्याकडुन एकुण ६७ बाटल्या जप्त करण्यात आल्या असुन त्याची एकुण किंमत ८ हजार ७८० रुपये आहे.
करडे येथे गावठी हातभट्टीची दारु जप्त…
करडे (ता. शिरुर) येथे २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. शितल काशीनाथ बांदल (रा. करडे, ता. शिरुर) हि महिला तिच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस आडोशाला विनापरवाना गावठी हातभट्टीची तयार दारु विक्रीच्या उद्देशाने बाळगून असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच ती घटनास्थळावरुन पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत पोलिसांनी पाच लिटर गावठी हातभट्टीची तयार दारुचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम अंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…
सदरच्या दोन्ही कारवाया शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले तसेच शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. मांडवगण फराटा येथील कारवाईत पोलीस अंमलदार भाऊसाहेब शहाजी टेंगले यांनी फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार एस पी खबाले तपास करत आहेत. तर करडे येथील कारवाईत पोलीस अंमलदार राजाराम शेटीबा गायकवाड यांनी फिर्याद दिली असुन पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इंडिया केम २०२६’मध्ये घोषणा; रासायनिक उद्योगातील गुंतवणूक आणि रोजगार दुप्पट करण्यावर…
हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर घणाघात; ५०० कोटींच्या आरोपांची ईडी चौकशी करण्याचीही मागणी मुंबई: राज्यातील वाढती…