मुख्य बातम्या

रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय कौशल्याने आणि तांत्रिक तपासाद्वारे पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. नुकतेच नियुक्त झालेले पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या नेतृत्वाखाली ही उल्लेखनीय कामगिरी पार पडली.

 

घटनाक्रमाचा तपशील…

दि. २५ मे २०२५ रोजी रांजणगाव गणपती परिसरात, पुणे-नगर महामार्गालगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनीजवळ एका दुर्गम भागात एक महिला व दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले होते. या घटनेची रांजणगाव पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली होती.

 

तपासात पुढे आलेले धागेदोरे…

मृत महिलेच्या हातावरील “जयभीम”, “Rajratan”, “mom dad”, “RS” या टॅटूंवरून ओळख पटविण्याचे प्रयत्न, तब्बल २५० सीसीटीव्ही फुटेज, १६,५०० भाडेकरू, कामगार, बँक खातेदार, आरोग्य विभाग, लसीकरण नोंदी पोलिसांनी तपासल्या कारण घटनास्थळ अत्यंत दुर्गम व पावसामुळे कोणतेही पुरावे सापडले नव्हते.

 

पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांची युक्ती…

या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे ग्रामीणचे नवनियुक्त पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्वतः सर्व ३३ पोलिस ठाण्यांमधून एक-एक अंमलदारांची निवड करुन स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर उपविभागीय पथकाच्या सहकार्याने ६ विशेष तपास पथके तयार केली आणि त्यांना महाराष्ट्रभर मानव मिसिंग नोंदींची चौकशी करण्यासाठी रवाना केले.

 

गुन्हेगाराचा शोध कसा लागला…? 

या तपासादरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात ९ मे रोजी दाखल झालेली एक मिसिंग नोंद तपास पथकाच्या हाती लागली. त्यातील वर्णन व मृतदेहातील वैशिष्ट्ये जुळत असल्याचे निष्पन्न झाले. तपासाअंती मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे (२५, रा. वाघोरा, बीड) असे निष्पन्न झाले. तिचे दोन लहान मुलांसह २३ मे रोजी गोरख पोपट बोखारे (३६, सध्या रा. सरदवाडी, शिरूर, मूळ रा. चिखली, श्रीगोंदा, अहमदनगर) या नातेवाईकासोबत आळंदी येथून निघाल्याचे निष्पन्न झाले.

 

असा झाला खुनाचा उलगडा….

प्रेमसंबंध आणि लग्नाच्या मागणीवरून आरोपी गोरख बोखारे याने स्वाती केशव सोनवणे आणि तिच्या दोन्ही चिमुरड्यांना दुर्गम भागात नेऊन गळा आवळून, डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्न करत गोरख बोखारे याला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यास ११ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण फक्त एक गुन्हा नसून, पोलिस दलाच्या चिकाटी, संघटित तपास प्रणाली आणि तांत्रिक कुशलतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.

 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, दौंड विभागाचे बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, AHTU पुणे ग्रामीण चे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, अविनाश थोरात, महिला पोलिस उपनिरीक्षक सविता काळे, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे स्थानिक गुन्हे शाखेचे दिपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, राजु मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, रामदास बाबर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरांदे, महेश बनकर, विनोद भोकरे, काशिनाथ राजापूरे, रांजणगाव पोलिस स्टेशनचे गुलाब येळे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिने, उमेश कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, शिक्रापूर पो स्टे चे जयराज देवकर, अमोल नलगे, शिरूर पोलिस स्टेशनचे विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, बीड जिल्हयात गेलेले विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय यादव, दरशथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमीत वाघ यांनी केली आहे.

रांजणगाव; तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा शोध सुरुच; मृतदेहाची ओळख अद्यापही पटेना

शिरूर तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला; महिलेसह दोन चिमुकल्यांची क्रूर हत्या

Video: शिरूर तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमणारः संदीपसिंग गिल

शिरूर तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला; महिलेसह दोन चिमुकल्यांची क्रूर हत्या

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

3 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

3 तास ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

3 तास ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

3 तास ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

3 तास ago

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

12 तास ago