मुख्य बातम्या

टाटा चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कायमच वाहतूक कोंडी; दंड वसुलीचा आकडा पाहा…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा स्टील, फियाट, वाडको पॅकेजिंग, ग्रुपो अँटोलीन, बजाज, एम टेक, पॉली प्लास्टिक, नॅनको एक्झिम, अथर्व पॉलिमर, थ्री ए,जामील स्टील या कंपन्या असुन या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल वाहतुक करणारी वाहने टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी केलेली असतात. त्यामुळे रोज सकाळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. या सर्व कंपन्यांवर वाहतुकीस अडथळा होत असल्याने गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र या संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचुंदकर (पाटील), शिरुर तालुकाध्यक्ष काशिनाथ पाचंगे, उपाध्यक्ष रणजित पाचंगे, सचिव दशरथ पंचरास यांनी केली आहे.

याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाला अनेकवेळा पत्रव्यवहार करुनही परिस्थिती “जैसे थे” असल्याने पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

बजाज कंपनी ते जामील स्टील या कंपनीकडे जाण्यासाठी एकाच बाजुने (वन वे) रस्ता असुन या सुमारे अर्धा किमी अंतराच्या रस्त्यावर नो पार्किंग झोन असतानाही या ठिकाणी नो पार्किंग मध्ये अवजड वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असुन या ठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. तसेच टाटा स्टील, फियाट, वाडको पॅकेजिंग, ग्रुपो अँटोलीन, बजाज या कंपन्यांच्या बाहेर रोजच दुतर्फा वाहनांच्या रांगा असल्याने स्थानिक नागरीकांना सकाळी १० वाजेपर्यंत रांजणगाव किंवा पुणे याठिकाणी जायचं असेल तर सुमारे ७ ते ८ किमी लांबच्या मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्यांना विनाकारण मनस्ताप होत असुन रस्त्याच्या दुतर्फा उभी असणारी आणि वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

रांजणगाव MIDC मध्ये सुमारे ४०० च्या आसपास कंपन्या आहेत. या कंपनीत बाहेरुन अनेक माल वाहतूक वाहने येत असतात. औद्योगिक वसाहतीत बाहेरुन येणाऱ्या वाहनांना पार्किंगसाठी वाहनतळ हे फक्त “कागदावरच” असून अनेक कंपनीच्या बाहेर कायमच दुतर्फा अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. नियमाप्रमाणे कंपनी बांधताना प्रत्येक कंपनीच्या आत वाहनांच्या पार्किंगची सोय असणे गरजेचे आहे. त्यामुळे कंपनीच्या गेटच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या गाड्यांची सोय कंपनीच्या आत करावी अन्यथा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने सदर कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचुंदकर (पाटील) आणि शिरुर तालुकाध्यक्ष काशिनाथ पाचंगे यांनी केली आहे.

रांजणगाव पोलिसांनी केली तब्बल ५१ लाखांची दंड वसुली…
रांजणगाव MIDC मधील अंतर्गत रस्त्यावर रहदारीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर रांजणगाव पोलिसांनी जानेवारी ते जुलै या दरम्यान कारवाई करत तब्बल ५१ लाख ५ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिली. रांजणगाव MIDC मधील अनेक कंपन्याच्या अंतर्गत रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडचण निर्माण होत असल्याने या वाहनांवर गेल्या ७ महिन्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करत दंड वसुल करण्यात आल्याचे मांडगे यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

22 तास ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

1 दिवस ago

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

3 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

3 दिवस ago

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कोणत्याही सोसायटीची अर्थिक वसुली साधारणतः जून महिन्यात पुर्ण होत असती ,…

3 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसीत कंपनीचे गोदाम जळून खाक

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील…

3 दिवस ago