शिक्रापुर (अर्जुन शेळके): शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शिक्रापुर येथील करंजेनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेनंतर, दोन चोर पुन्हा चोरी करण्याच्या तयारीत असताना हवालदार विकास पाटील व राम जाधव यांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान ही कारवाई करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या दोघांपैकी एकाचे नाव शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. मोगा, ता. उदगीर, जि. लातूर) असून त्याच्यावर लातूर व पुणे येथे तब्बल १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासोबत एक अल्पवयीन साथीदार देखील होता. त्यांनी शिक्रापूर परिसरातील अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे दोघेही चोरीच्या उद्देशाने संशयितरीत्या फिरत होते. मात्र पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. त्या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तरीही हवालदार विकास पाटील आणि राम जाधव यांनी सतर्कता दाखवत त्यांचा पाठलाग करुन त्यांना रंगेहाथ पकडले.
या कामगिरीमुळे पोलिस हवालदार विकास पाटील व राम जाधव यांच्या धाडसी वृत्तीचे सर्वांनी कौतुक केले असुन सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच शिक्रापुर आणि आसपासच्या परीसरातील नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेबाबत विश्वास वाढला असुन यापुढील काळात चोऱ्यांचे प्रमाण कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे.
शिरुर पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश
शिरुर पोलिसांचा गुन्हेगारांना खरंच धाक राहिलाय का…? विनयभंग प्रकरणात पिडीतेला जिवे मारण्याची धमकी
शिरुर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई मोटेवाडी येथे डाळिंब चोरी करणारा चोरटा गजाआड
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…
वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…
मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…
राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…
मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…