शिरुर पोलिसांचा गुन्हेगारांना खरंच धाक राहिलाय का…? विनयभंग प्रकरणात पिडीतेला जिवे मारण्याची धमकी

क्राईम मुख्य बातम्या

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात रेशन दुकानात रेशन आणायला गेलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या एका २८ वर्षीय महिलेचा विनयभंग करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार करडे गावात घडला होता. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने संबंधित रेशन दुकानदारा विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

परंतु फिर्याद दाखल केल्यानंतर संबंधित महिलेवर करडे गावातील काही राजकीय व्यक्तींनी फिर्याद मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव आणला. परंतु पिडीत महिला आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने आरोपीच्या एका मुलाने काल (दि १५) रोजी पिडीतेला जिवे मारण्याची धमकी दिली. तर आज (दि १६) रोजी करडे गावातील स्वयंघोषित गोल्डमॅन असलेल्या एका गावगुंडाने शिरुर-बायपास रस्त्यावर चारचाकी गाडी आडवी लावुन पिडीतेला जिवे मारण्याची धमकी दिली. या दोघां विरोधात पिडीत महिलेने शिरुर पोलिस स्टेशन येथे तक्रार  दिली आहे.

शिरुरला सिंघम अधिकाऱ्याची गरज…?

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असुन अनेक गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत मोठया प्रमाणात अवैध धंद्याना ऊत आलेला आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाय की नाही हा मोठा यक्षप्रश्न आहे. शिरुर पोलिस स्टेशन मध्ये गंभीर गुन्हे दाखल असताना आरोपी बिनधास्तपणे सार्वजनिक कार्यक्रमात फिरत असतील तर आरोपीला कायद्याचा किती धाक आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे जर गुन्हेगांरावर वचक बसवायचा असेल तर शिरुरला नारायण सारंगकर किंवा दयानंद गावडे यांच्यासारख्याच ‘डॅशिंग’ अधिकाऱ्याची गरज असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

(क्रमशः)

शिरूर तालुक्यात रेशन दुकानात महिलेसोबत लज्जास्पद वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी

शिरुर; विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी ‘त्या’ फिर्यादी महिलेवर राजकीय पुढाऱ्यांचा दबाव…?

शिरुर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई मोटेवाडी येथे डाळिंब चोरी करणारा चोरटा गजाआड