मुख्य बातम्या

शिक्रापूर पोलिसांची दमदार कामगिरी! साडेसात मिनिटांत फॉर्च्युनर चोरी; वर्षभरानंतर आंध्र प्रदेशातून शोध

आंध्र प्रदेशात पाच दिवस मुक्काम; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे माजी सरपंच संदीप ढेरंगे यांची गाडी पुन्हा ताब्यात 

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : अवघ्या साडेसात मिनिटांत महागडी टोयोटा फॉर्च्युनर गाडी चोरून चोरटे पसार झाले; मात्र शिक्रापूर पोलिसांनी वर्षभर सातत्याने तपासाची चक्रे फिरवत चोरीचा छडा लावला. थेट आंध्र प्रदेशातून चोरीची गाडी शोधून काढत ती पुन्हा मालकाच्या ताब्यात देण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, चोरीची गाडी ताब्यात घेण्यासाठी शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला आंध्र प्रदेशात तब्बल पाच दिवस मुक्काम करावा लागला.

कोरेगाव भीमा येथील माजी सरपंच संदीप ढेरंगे यांची MH 12 TH 9955 क्रमांकाची टोयोटा फॉर्च्युनर १६ ऑक्टोबर रोजी पहाटे पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या यशराज टॉवर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अवघ्या साडेसात मिनिटांत ही महागडी गाडी लंपास केली होती. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरीची घटना कैद झाली होती. फुटेजमध्ये दोन ते तीन संशयित व्यक्ती किया कारमधून परिसरात आल्याचे दिसून आले होते.

या घटनेनंतर संदीप ढेरंगे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू करत चोरीला गेलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. अखेर तपासादरम्यान चोरीची फॉर्च्युनर आंध्र प्रदेश राज्यात असल्याची माहिती समोर आली.

आंध्र प्रदेशात पाच दिवस पोलिसांचा मुक्काम

चोरीची फॉर्च्युनर ताब्यात घेण्यासाठी पोलीस हवालदार अजित इंगवले, पोलीस हवालदार विश्वंभर वाघमारे आणि माजी सरपंच संदीप ढेरंगे आंध्र प्रदेशात रवाना झाले. मात्र, दुसऱ्या राज्यातून चोरीचे वाहन परत मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे या पथकाला तब्बल पाच दिवस आंध्र प्रदेशात मुक्काम करावा लागला.

ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होऊन वाहन लवकर ताब्यात मिळावे, यासाठी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आंध्र प्रदेशातील संबंधित पोलीस आयुक्तांशी सातत्याने संपर्क साधत पाठपुरावा केला. तसेच पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल यांनीही संबंधित पोलीस आयुक्तांशी थेट संवाद साधून या प्रकरणात लक्ष घातले.

दोन्ही राज्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयातून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि अखेर चोरीची फॉर्च्युनर ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर ही गाडी पुन्हा संदीप ढेरंगे यांच्या स्वाधीन करण्यात आली.

पोलिसांच्या मेहनतीला यश; ढेरंगे कुटुंबीयांना दिलासा

अवघ्या साडेसात मिनिटांत चोरीला गेलेली फॉर्च्युनर वर्षभराच्या तपासानंतर आंध्र प्रदेशातून शोधून काढण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले. पोलिसांचा सातत्यपूर्ण तपास, कर्मचाऱ्यांचा आंध्र प्रदेशातील पाच दिवसांचा मुक्काम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रभावी पाठपुरावा यामुळे संदीप ढेरंगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चोरीला गेलेली गाडी पुन्हा मिळाल्याने ढेरंगे कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. साडेसात मिनिटांत झालेली चोरी, वर्षभरानंतर लागलेला छडा आणि आंध्र प्रदेशातील पाच दिवसांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर मालकाला परत मिळालेली फॉर्च्युनर, यामुळे शिक्रापूर पोलिसांच्या या कामगिरीची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेतातील डीपी चोरणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांकडून पर्दाफाश; पाच जणांना अटक

आठ ठिकाणी चोरीची कबुली; १७० किलो तांब्याच्या तारा जप्त, २ लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत…

10 मिनिटे ago

दीड महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा लाचखोर हवालदार अखेर जेरबंद!

९५ हजारांची लाच घेऊन झाला होता पसार; शिरूर नगरपरिषद परिसरातून एसीबीने ठोकल्या बेड्या शिरूर (अरुणकुमार…

15 मिनिटे ago

Video; शिरुर अन श्रीगोंदा महसुल विभागाचा वाळू माफियांना दणका; आठ सेक्शन अन नऊ फायबर बोटी फोडल्या

शिंदोडी (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब…

1 तास ago

Video! शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाचा खेळखंडोबा! निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनचालक हैराण…

शिक्रापूर, ता. १६ नोव्हेंबर २०२६ (तेजस फडके) : शिक्रापूर ते मलठण या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे…

6 तास ago

काहीही खाल्लं तरी छातीत जळजळ होते? लगेच करा हे सोपे उपाय झटक्यात मिळेल आराम

जेवण केल्यानंतर अनेकदा अनेकांना छातीत जळजळ होते. ज्याला हार्टबर्न किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स म्हटलं जातं. छातीत…

14 तास ago

उडीद खाण्याचे फायदे

पचन सुधारते: उडीद डाळ खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामध्ये…

14 तास ago