मुख्य बातम्या

शिरुर येथुन अचानक आई व मुलगा बेपत्ता, पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची तक्रार दाखल; पतीचे गंभीर आरोप

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग (ता.शिरुर) येथुन सुमन सखाराम साळवे (वय ४४) व त्यांचा मुलगा जिवन सखाराम साळवे (वय १८ ) हे दोघेही (दि ३) ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरातुन कोणाला काहीही न सांगता निघुन गेले असल्याने शिरुर पोलिस स्टेशन येथे रीतिक सखाराम साळवे यांनी आई व भाऊ हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक शिंदे हे करत आहेत.

 

मिसींग व्यक्तीचे नाव व वर्णन 

आईचे वर्णन पुढीलप्रमाणे… 

सुमन सखाराम साळवे (वय ४४वर्ष ) रा. रामलिंग, ता. शिरुर, जि. पुणे, रंग काळा-सावळा, चेहरा गोल, केस काळे लांबसडक, उंची ५ फुट ,अंगात चुडीदार, पायात चप्पल, कानामध्ये सोन्याची रिंग, पायामध्ये पैंजन व जोडवे, कपाळावरती लाल रंगाची टिकली

 

मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे…

जिवन सखाराम साळवे (वय १८ वर्ष) रा. रामलिंग ता. शिरुर, जि.पुणे रंगाने काळा सावळा, चेहरा गोल, केस काळे व मध्यम उंची ५फुट ५ इंच, नेसणीस काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट व फुलबाहयाचा शर्ट,

सदरच्या दोन्ही व्यक्ती आढळल्यास त्वरीत शिरुर पोलिस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन शिरुर पोलिसांनी केले आहे.

 

ते दोघेही मानसिक त्रासामुळे घर सोडुन गेले…?

सुमन सखाराम साळवे यांचे पती सखाराम साळवे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या प्रतिनिधी संपर्क साधत रामलिंग परीसरातील एका नामांकित ‘इंग्लिश मिडीयम’ शाळेतील काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी माझी पत्नी व मुलगा यांचा गेले अनेक दिवस मानसिक छळ चालविला होता असा गंभीर आरोप केला आहे. तसेच सुमन साळवे या घरातुन निघुन गेल्यानंतर त्यांनी आपले पती सखाराम साळवे यांना ‘व्हाटस ऍप’ वर मेसेज पाठवला असुन त्यात रामलिंग परीसरात असलेल्या एका नामांकित ‘इंग्लिश मिडीयम’ शाळेतील शिक्षकांनी कसा त्रास दिला याबाबत सविस्तर खुलासा केला असुन तो मेसेज “शिरुर तालुका डॉट कॉम” ला प्राप्त झाला आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

4 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

10 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

11 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

11 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

11 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

12 तास ago