शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामामुळे रस्त्यांची लागली वाट; खोदकामाचा अंदाज न आल्याने पिकअप पलटी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील लंघेमळ्यात सविंदणे-लोणी रस्त्यालगत जलजीवन मिशन योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरु आहे. या ठिकाणी केलेल्या खोदकामाचा अंदाज न आल्याने रविवारी (ता ४) सकाळच्या सुमारास पिकअप (एम एच १४ ई एम ५६९०) पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

शिरुर तालुक्यातील अनेक गावांत सध्या जलजीवन मिशनची कामे सुरु आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी. यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. सविंदणे-लोणी रस्त्यालगत जलजीवन मिशन योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरु आहे. परंतु यासाठी ठेकेदाराने रस्त्यालगत केलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. पावसामुळे खोदकामाची माती रस्त्यावर पसरुन चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे सातत्याने लहान मोठे अपघात घडत आहेत.

 

सविंदणे ते लोणी रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या रस्त्याने एसटी बस, शेतमाल वाहतूक करणाऱ्या गाड्या, इ वाहनांची नेहमीच वर्दळ असते. ठेकेदाराने रस्त्यालगतच खोदकाम केले असल्याने साईडपट्टयांचे नुकसान होत असुन त्या खचल्या आहेत. जलवाहिनीसाठी केलेल्या खोदकामांमुळे रस्त्याची पुर्णपणे वाट लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची पाहणी करुन लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

“सविंदणे येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला चर खोदून ठेवले आहेत. हे काम संथगतीने काम सुरु असून वारंवार छोटे मोठे अपघात घडत आहेत. याला ठेकेदाराचा हलगर्जीपणा जबाबदार आहे.”

शुभांगी पडवळ

सरपंच (सविंदणे)

 

“जलजीवन मिशन योजनेचे काम करत असताना, ज्या ठिकाणी चर खणून उघडे आहेत. ते तातडीने बुजविण्याच्या सुचना दिल्या आहेत. रस्त्याच्या कडेने पाईप लाईन घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. पावसामुळे सध्या काम बंद ठेवले आहे.”

डी.डी.पवार

शाखा अभियंता (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण)

 

” सविंदणे येथे जलजीवन मिशनचे काम सुरू असून पावसामुळे रस्त्यावर काही ठिकाणी चिखल साचला आहे. ज्या ठिकाणी साईडपट्टया व रस्ता खराब झाला आहे. ती कामे पावसाळ्यानंतर प्राधान्याने पुर्ण केली जाणार आहे.”

सुर्यकांत कुंभार

(सार्वजनिक बांधकाम विभाग) 

शिरुर येथुन अचानक आई व मुलगा बेपत्ता, पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची तक्रार दाखल; पतीचे गंभीर आरोप

शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादकांनी सुक्ष्म अन्नद्रव्यांना महत्व द्यावे; जयवंत भगत

शिरुर तालुका म्हणजे अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण; सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडे करोडोंची माया…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सविंदणे विद्यालयात ‘अजितदादा एआय लॅब’चे उद्घाटन!

विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स, ड्रोन आणि थ्रीडी प्रिंटिंगचे मिळणार प्रात्यक्षिक शिक्षण; उच्च शिक्षणासाठी ठरणार उपयुक्त शिरूर…

8 तास ago

पुण्यात पाणीटंचाईचे संकट गडद! महापौर मंजुषा नागपुरेंचे प्रशासनाला कडक आदेश

पाणीगळती, पाणीचोरी आणि टँकरच्या काळाबाजारावर कारवाई होणार; पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांचे नळजोड तोडणार! पुणे :…

15 तास ago

शिरुर; न्हावरे रस्त्यावर दुचाकीवरुन पडुन जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरा रोड येथे दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय…

16 तास ago

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या चोरी; घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन…

16 तास ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा…

18 तास ago

शिरूर! कारेगावात तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार करत थेट जीव घेण्याचा प्रयत्न…

कारेगाव (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच कारेगाव येथे एका…

18 तास ago