शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळताच शिरुर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. (दि १९) रोजी सायंकाळी ६:२० वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत एका कथित पत्रकारासह दोघांना अटक करण्यात आली असून, संबंधित महिलेला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलेला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कथित पत्रकार अनिल किसन डांगे (वय ४२, रा. इंदिरानगर, शिरूर), सचिन महादेव जाधव (वय ३७, रा. राजहंस लॉज, सरदवाडी) आणि पिंटू दोरगे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. सरदवाडी) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरुन काही रोख रक्कम आणि ग्राहकांच्या नोंदी असलेले रजिस्टर असा एकूण १ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित महिलेच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलिसांच्या मदतीने आवश्यक कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र तात्याबा काळे यांनी फिर्याद दिली असुन पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पुढील तपास करत आहेत.
आधी अवैध व्यवसायाविरुद्ध निवेदन नंतर स्वतःच अवैध व्यवसायात…
शिरुर तालुक्यात चालणाऱ्या अनधिकृत व्यवसायाविरुद्ध कथित पत्रकार अनिल डांगे यांनी २२ जून २०२३ रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक, ग्रामीण पोलिस अधिक्षक, शिरुरचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यानंतर उपोषणाचा इशाराही दिला होता. परंतु तीन वर्षांनंतर त्यांनाच अनधिकृत ‘वेश्या’ व्यवसाय प्रकरणात अटक झाली आहे.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास…
श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…
मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…
धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…
मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल; आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात नागपूर: मुंबईत पुन्हा दहशतीचे…