मुख्य बातम्या

शिरुर; हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये तालुक्यातील नामांकित डॉक्टरांचा सहभाग…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यात उघडकीस आलेल्या हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमुळे संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली असताना या घृणास्पद धंद्याचे धागेदोरे आता थेट शिरुर शहरातील काही नामांकित डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला असल्याची खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली असुन शिरुर शहरातील काही डॉक्टर आणि खासगी दवाखाने सध्या त्यांच्या रडारवर असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे.

ढोकसांगवी (ता. शिरुर) परिसरात बुधवार (दि 4) मार्च रोजी मोबाईल ॲपच्या माध्यमातून गुप्तपणे ‘गर्भलिंग निदान’ करुन देणाऱ्या रॅकेटचा आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या डॉ. आकाश सुभाष मलगुंडे याच्यासह एजंट नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली) या दोघांवर कठोर कारवाई करण्यात आली. या कारवाईत डॉक्टर आणि एजंटला ताब्यात घेण्यात आले असून चौकशीदरम्यान अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोबाईल ॲपच्या माध्यमातून चालत होता काळाबाजार

या रॅकेटमध्ये गर्भलिंग तपासणीसाठी मोबाईल ॲपचा वापर केला जात होता. एजंटमार्फत गर्भवती महिलांना गुप्तपणे संपर्क साधून त्यांना ठरावीक दवाखान्यात आणले जात होते आणि तेथे मोबाईल ॲपच्या माध्यमातून लिंगनिदान केले जात असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या अवैध चाचणीसाठी लाखों रुपयांची रक्कम आकारली जात असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

या प्रकरणात काही संशयास्पद कागदपत्रे, औषधे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.तसेच खात्रीलायक सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरुर शहरातील काही नामांकित डॉक्टरांचाही सहभाग असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कायद्याला हरताळ फासणारा घृणास्पद प्रकार

गर्भलिंग निदान करणे हा PCPNDT कायद्याअंतर्गत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. तरीदेखील पैशाच्या हव्यासापोटी काही डॉक्टर आणि एजंटांनी या कायद्याला हरताळ फासून समाजात मुलगी जन्माला येऊ नये यासाठी घृणास्पद कृत्य करत लाखों रुपये कमविल्याचा आरोप सर्वसामान्य लोकांनी केला आहे.

प्रशासनाची कसोटी; ‘मोठे मासे’ गळाला लागणार का…?

दरम्यान, या प्रकरणामुळे शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.फक्त एखादा एजंट किंवा एखादा डॉक्टर यांच्यावर कारवाई करुन असले गैरप्रकारथांबणार नाहीत. तर या संपुर्ण रॅकेटचा पर्दाफाश होणं गरजेचे आहे.त्यामुळे तपास यंत्रनांसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले असून या रॅकेटमागील खरे सूत्रधार उघड करण्याची मागणी जोर धरत आहे. हा काळाबाजार नेमका किती वर्षांपासून सुरु आहे आणि या मागे नेमके कोणाचा हात आहे. याकडे आता संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

10 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

15 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 तास ago