मुख्य बातम्या

शिरुर; हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये तालुक्यातील नामांकित डॉक्टरांचा सहभाग…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात उघडकीस आलेल्या हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमुळे संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली असताना या घृणास्पद धंद्याचे धागेदोरे आता थेट शिरुर शहरातील काही नामांकित डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला असल्याची खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली असुन शिरुर शहरातील काही डॉक्टर आणि खासगी दवाखाने सध्या त्यांच्या रडारवर असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे. 

ढोकसांगवी (ता. शिरुर) परिसरात बुधवार (दि 4) मार्च रोजी मोबाईल ॲपच्या माध्यमातून गुप्तपणे ‘गर्भलिंग निदान’ करुन देणाऱ्या रॅकेटचा आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या डॉ. आकाश सुभाष मलगुंडे याच्यासह एजंट नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली) या दोघांवर कठोर कारवाई करण्यात आली. या कारवाईत डॉक्टर आणि एजंटला ताब्यात घेण्यात आले असून चौकशीदरम्यान अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

मोबाईल ॲपच्या माध्यमातून चालत होता काळाबाजार…

या रॅकेटमध्ये गर्भलिंग तपासणीसाठी मोबाईल ॲपचा वापर केला जात होता. एजंटमार्फत गर्भवती महिलांना गुप्तपणे संपर्क साधून त्यांना ठरावीक दवाखान्यात आणले जात होते आणि तेथे मोबाईल ॲपच्या माध्यमातून लिंगनिदान केले जात असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या अवैध चाचणीसाठी लाखों रुपयांची रक्कम आकारली जात असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. 

कायद्याला हरताळ फासणारा घृणास्पद प्रकार…

गर्भलिंग निदान करणे हा PCPNDT कायद्याअंतर्गत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. तरीदेखील पैशाच्या हव्यासापोटी काही डॉक्टर आणि एजंटांनी या कायद्याला हरताळ फासून समाजात मुलगी जन्माला येऊ नये यासाठी घृणास्पद कृत्य करत लाखों रुपये कमविल्याचा आरोप सर्वसामान्य लोकांनी केला आहे.

प्रशासनाची कसोटी; ‘मोठे मासे’ गळाला लागणार का…?

दरम्यान, या प्रकरणामुळे शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.फक्त एखादा एजंट किंवा एखादा डॉक्टर यांच्यावर कारवाई करुन असले गैरप्रकारथांबणार नाहीत. तर या संपुर्ण रॅकेटचा पर्दाफाश होणं गरजेचे आहे. त्यामुळे तपास यंत्रणांसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले असून या रॅकेटमागील खरे सूत्रधार उघड करण्याची मागणी जोर धरत आहे. हा काळाबाजार नेमका किती वर्षांपासून सुरु आहे आणि या मागे नेमके कोणाचा हात आहे. याकडे आता संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात काही संशयास्पद कागदपत्रे, औषधे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. तसेच खात्रीलायक सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरुर शहरातील काही नामांकित डॉक्टरांचाही सहभाग असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

(क्रमश:) 

शिरूर तालुक्यातील एका गर्भलिंग निदान करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

शिरूर तालुक्यात हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेट; नामांकित डॉक्टर सामील…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

16 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

16 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

16 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

18 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago