मुख्य बातम्या

भाजप नेत्याच्या फार्म हाऊसवर बलात्कार; फार्म हाऊस कोणाचे पाहा…

शिक्रापूर: शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भाजप नेत्याच्या शेती आणि फार्म हाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुराचा अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. विशाल गायकवाड असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे हे फॉर्महाऊस भाजप नेते गणेश बिडकर यांचे असल्यामुळे प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

शिक्रापूर पोलिसांनी विशाल गायकवाड याला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार बिडकर यांच्या मालकीच्या शेती आणि फार्म हाऊसवर घडला आहे. दरम्यान, पीडितेला न्याय मिळवून देत असताना दबाव येणार असल्याचा गंभीर आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे.

पुण्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पुण्यातील एका भाजप नेत्याच्या शेती आणि फार्म हाऊसवर विशाल गायकवाड आणि पीडित मुलगी यांचे आई-वडील वास्तव्य आणि कामासाठी आहेत. पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर विशालने या फार्म हाऊसच्या मागच्या मजूर खोल्यांच्या मागे या अल्पवयीन मुलीला नेले. तेथे गेल्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. याता याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

संबंधित फार्महाऊस भाजपचा नेता गणेश बिडकर यांची असल्यामुळे त्याची चर्चा कुठे होऊ नये, या फार्म हाऊसची चर्चा कुठे होऊ नये, यासाठी दबाव आणला जाऊ शकतो, अशी स्थानिकांनी शक्यता व्यक्त केली आहे, अशी माहिती तृप्ती देसाई यांनी दिली. अशा अनेक तक्रारी आणि फोन मला आले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे, की या 12 वर्षीय मुलीला न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवले जावे तसेच संबंधित भाजप नेत्याचा घटनेशी संबंध नसला तरी फार्म हाऊस त्यांच्या मालकीचे आहे. त्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.

शिरुर तालुक्यात भाजप नेत्याच्या फॉर्म हाऊसवर बारा वर्षीय बालिकेवर बलात्कार

शिरूर तालुक्यातील भाजप नेत्याच्या फार्म हाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तृप्ती देसाई आक्रमक…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

2 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

11 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

11 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

11 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

11 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

12 तास ago