Categories: इतर

हृदयद्रावक! अपहरण केलेल्या चिमुकल्याची हत्या करणारे जेरबंद…

पुणे: पिंपरी चिंचवडमधील अजमेरा नगर परिसरात राहणाऱ्या आदित्य ओगले (वय ८) या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मागील 2 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. आदित्यचा नुकताच मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ओगले 2 दिवसांपासून बेपत्ता होता. 2 युवकांनी अपहरण केले होते. त्यावेळी त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्यांनी क्लोरोफॉर्मचा वापर केला होता. मात्र क्लोरोफॉर्म अतिवापर केला गेल्याने आणि पोत्यात बांधून ठेवल्याने त्यात श्वास कोंडून आदित्यचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणाचा तपास पिंपरी चिंचवड पोलिस करत आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. आदित्यच्या बेपत्ता होण्याची माहिती अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यामुळे आरोपी अधिक सावध झाले आणि पकडले जाऊ नये या भीतीने त्यांनी आदित्यची हत्या केली, अशी देखील शक्यता वर्तवली जात होती. पण, या आरोपींनी दिलेल्या कबुलीनंतर सर्वांना धक्का बसला.

पिंपरी चिंचवड पोलिस दलातील सुमारे 200 पोलिस आदित्यचा शोध घेत होते. तपास वेगाने केल्याने ते आरोपीपर्यंत पोहोचले. मात्र, दुर्दैवाने आदित्यला वाचविण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना अपयश आले. पोलिसांनी या घटनेचा तपास अतिशय वेगाने करत अपहरणकर्त्या दोन्ही युवकांना अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

5 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

5 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

5 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

5 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

6 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

11 तास ago