मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पिस्टल घेणाऱ्यांचे दणाणले धाबे…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगीक वसाहत असल्याने MIDC तील कंपन्यामध्ये अनेक कामगार कामानिमित्त येत असतात. त्यातील काहीजण याठिकाणी दहशत निर्माण करण्याचे काम करत आहेत. रांजणगाव पोलिसांनी गावठी बनावटीचे एक पिस्टल, जिवंत काडतूस आणि कोयता बाळगल्याप्रकरणी संकेत संतोष महामुनी (रा.शिरुर,ता.शिरुर जि पुणे तसेच प्रथमेश संतोष नवले (रा.कारेगाव ता शिरुर जि. पुणे) या दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीकडून आणखी चार गावठी कट्टे जप्त करण्यात रांजणगाव पोलिसांना यश आले आहे. आरोपीनी सदरचे गावठी कट्टे हे विक्री करीता आणले होते. तसेच त्याची विक्री देखील केल्याची माहिती समोर येत आहे. सदरचे गावठी कट्टे विकत घेणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली असून, या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आठ झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे जप्त करण्याची ही परिसरातील पहिली घटना आहे.

आरोपी हा गावठी कट्टे मध्यप्रदेश वरुन विकत आणून परिसरात विक्री करत होता. त्यास रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केल्याने त्याच्याकडून कट्टे विकत घेणा-या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कट्टे विकत घणारे सध्या फरार झाले आहेत. रांजणगाव एमआयडीसी पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश ढवाण, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलिस हवालदार संतोष औटी, बैजनाथ नागरगोजे, विलास आंबेकर, विजय सरजिने यांनी केली आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.

रांजणगाव MIDC पोलीसांनी पिस्टल व कोयते जवळ बाळगलेल्या दोन जणांना केले जेरबंद

रांजणगाव पोलीसांनी विद्युत रोहीत्राच्या तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या तीन चोरांना अटक करुन 15 गुन्हे आणले उघडकीस

रांजणगाव MIDC पोलीसांनी शेतीपंप चोरी करणा-या तीन चोरांना अटक करत 10 गुन्हे आणले उघडकीस

रांजणगाव MIDC तील फियाट कंपनीतुन 8 लाख 40 हजार रुपयांच्या गाडीच्या पार्टची चोरी

रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात नवनियुक्त PI महेश ढवान यांनी पदभार स्वीकारला; स्वागताला “तो” हजर 

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत जबरी मारहाण करुन मोबाईल व रोख रक्कम चोरणारा आरोपी जेरबंद

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

11 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

11 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

13 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

15 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

15 तास ago