मुख्य बातम्या

शिरुर; कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या महिला सरपंचाच्या पतीची मेहुण्याच्या नावावर MIDC मध्ये दहशत…?

कारेगाव (तेजस फडके) “रांजणगाव MIDC तील कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?” अशा आशयाचे वृत्त ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने प्रसिद्ध केल्यानंतर कारेगाव येथील एका माजी महिला सरपंचाच्या पतीचे अनेक कारनामे समोर आले आहेत. पत्नी सरपंच असल्याचा गैरफायदा घेत या महाशयांनी ग्रामपंचायतची अनेक कामे स्वतःचे मेहुणे तसेच त्यांच्या मित्रांना दिल्याचे एका ग्रामपंचायत सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

तसेच कारेगाव हद्दीतील अनेक कंपन्यामध्ये गावातील काही स्थानिक बेरोजगार तरुणांना काम मिळालेले असताना कंपनी प्रशासनावर दबाव टाकत ती कामे स्वतः किंवा स्वतःच्या मेहुण्यांना देण्याचा सपाटाच या महाशयांनी लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत जवळचे संबंध असल्यामुळे सगळ्या प्रशासकीय यंत्रणेवर हे महाशय राजकीय दबाव आणत असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

कारेगाव ग्रामपंचायतच्या विविध कामाच्या निविदा स्वतःचे मेहुणे किंवा त्यांचे मित्र यांच्या नावावर भरुन ग्रामपंचायतची विविध विकासकामे या महाशयांनी स्वतःच्या नातेवाईकांना दिली असल्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. तसेच कारेगाव हद्दीतील अनेक कंपन्यामध्ये गावातील दुसऱ्या व्यक्तीला ‘वर्क ऑर्डर’ असताना हे काम मीच करणार अशी दादागिरी राजकीय दबाव वापरुन हे महाशय करत आहेत.

अजित पवार व दिलीप वळसे पाटील लक्ष घालणार का…?
बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर वाल्मिक कराड मुळे मंत्री असलेले धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्यानंतर अजित पवार यांच्यावर पण मोठया प्रमाणात टिकेची झोड उठली होती. राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे महाशयसुद्धा रांजणगाव MIDC मध्ये उपद्रव करत असल्यामुळे अजित पवार तसेच दिलीप वळसे पाटील यांनी या महाशयांना आवरणे गरजेचे आहे. अन्यथा आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे एका राजकीय पदाधिकाऱ्याने ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले.

रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?

शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; कहीं खुशी, कहीं गम

Video; रांजणगाव MIDC तील MEPL च्या प्रश्नावर खासदार डॉ अमोल कोल्हे आक्रमक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

17 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago