शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील शिक्षकांचा पेन आणि फेटा बांधून सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोसायटीने हा उपक्रम राबविला.
शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून, विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नव्हे, तर संस्कार देऊन त्यांना जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य करतात. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने शिक्षक दिनानिमित्त हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन नाना फुलसुंदर, सुभाष दंडवते, शरद गिते, संचालक महादू गायकवाड, ज्येष्ठ शिक्षक अविनाश गायकवाड, सचिव मोहन वाव्हळ, सागर कदम आदी उपस्थित होते. शिक्षकांच्या सन्मानासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
“शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देत नाहीत, तर त्यांच्यावर संस्कार करून उत्तम नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनानिमित्त हा सन्मान सोहळा आयोजित केला असून, शिक्षकांचा सन्मान करण्याची परंपरा कायम राहावी.
नाना फुलसुंदर, माजी चेअरमन
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास…
श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…
मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…
धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…
मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…