मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी मुंबईत घडलेल्या दोन दुर्घटनांनी उत्सवाला गालबोट लागले आहे. ऐरोलीत मानवी मनोरा रचताना तोल जाऊन पडलेल्या ३४ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. तर मालाडच्या मालवणी परिसरात दहीहंडीसाठी बांधलेला खांब कोसळल्याने सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान आतापर्यंत १६८ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
ऐरोलीत थरावरून पडून गोविंदाचा मृत्यू
नवी मुंबईतील ऐरोली येथील साईनाथवाडी परिसरात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानवी मनोरा रचताना घणसोली येथील ३४ वर्षीय स्वप्निल याचा अचानक तोल गेला आणि तो खाली कोसळला. या दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर आयोजकांनी स्वप्निलला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, रबाळे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मालाडमध्ये खांब कोसळला; सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील चिकुवाडी येथे स्थानिक मुलांकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. हंडी फोडण्यासाठी बांधलेला दोर एका झाडाला आणि इमारतीच्या तळमजल्यावरील खांबाला बांधण्यात आला होता.
हंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच संबंधित खांब अचानक कोसळला. यावेळी सात वर्षीय रुद्र कदम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबईत १६८ गोविंदा जखमी
मुंबईतील विविध भागांत दहीहंडीच्या उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना झालेल्या दुर्घटनांमध्ये शनिवारी रात्रीपर्यंत १६८ गोविंदा जखमी झाल्याची नोंद सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये झाली.
यापैकी २९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर ८१ जणांवर उपचार सुरू होते. उपचारानंतर ५८ गोविंदांना घरी सोडण्यात आले.
रात्री ९ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, सेंट्रल रिजनमधील रुग्णालयांमध्ये १०६, ईस्टर्न सबर्ब्समध्ये २९ आणि वेस्टर्न सबर्ब्समध्ये ३३ जखमी गोविंदांची नोंद झाली.
केईएम रुग्णालयात सर्वाधिक ३३ जखमी गोविंदांवर उपचार करण्यात आले. राजावाडी रुग्णालयात २०, नायरमध्ये १७, पोतदारमध्ये १६, हिंदुजा येथे १४, बीडीबीए रुग्णालयात १३ आणि सायन रुग्णालयात आठ जखमी गोविंदांची नोंद झाली.
दहीहंडीचा उत्साह, थरार आणि जल्लोष दरवर्षीप्रमाणे यंदाही पाहायला मिळाला. मात्र दोन जणांचा मृत्यू आणि शेकडो गोविंदा जखमी झाल्याने दहीहंडीच्या आयोजनातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…
पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…
शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…
आमदार संजय गायकवाडांविरोधात कोथरूड पोलिसांकडे तक्रार पुणे: संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.…