मुख्य बातम्या

बेट भागात यात्रा-जत्रांचे उत्सव सुरू, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम

शिरूर (अरुणकुमार मोटे):  शिरूर तालुक्यातील बेट भाग सध्या धार्मिक आणि सांस्कृतिक रंगांनी न्हालेला आहे. एप्रिल महिना आला की या भागातील गावोगावी पारंपरिक थाटामाटात यात्रा-जत्रांचे आयोजन केले जाते. गावकऱ्यांच्या उत्साहात आणि बाहेरगावी असलेल्या लोकांच्या मोठ्या उपस्थितीत या यात्रांचा उत्सव सर्वदूर दुमदुमत असतो. या यात्रांमध्ये देव जन्माचे कीर्तन, बैलगाडा शर्यती, तमाशा, ऑर्केस्ट्रा, कुस्त्यांचे जंगी आखाडे अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी खास बाजार भरवले जातात, ज्यामध्ये खेळणी, खाऊगल्ली व विविध वस्तूंचा समावेश असतो.

शिरूर तालुक्यातील फाकटे, वडनेर, पिंपरखेड, निमगाव दुडे, म्हसे, सविंदणे, कवठे येमाई, कान्हूर मेसाई, टाकळीहाजी, जांबुत, चांडोह आदी गावांमध्ये यात्रांचे आयोजन होत आहे. विशेष म्हणजे पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त असणारे नागरिकही आपापल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी गावी येत आहेत.

सविंदणेतील भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्साहात…

सविंदणे येथे जागृत देवस्थान असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेला विशेष महत्त्व आहे. यंदा ही यात्रा शुक्रवार (दि. ११) व शनिवार (दि. १२) रोजी पार पडणार आहे. या यात्रेच्या आयोजनाची माहिती सरपंच मनिषा नरवडे व भैरवनाथ छबिना मंडळाने दिली.

यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी कीर्तन, मांडव डहाळे, श्री विवाह सोहळा, बैलांची मिरवणूक, १० ते ६ दरम्यान बैलगाडा शर्यत, रात्री ८ ते ११ शेरणी, नंतर देवाचा छबिना व पालखीचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी हनुमान जन्म उत्सव, प्रसिद्ध तमाशा मंडळाचा कार्यक्रम आणि दुपारी कुस्त्यांचा दंगल आखाडा आयोजित करण्यात आला आहे.

येमाई देवी यात्रोत्सवाची तयारी जोमात…

राज्यभरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री येमाई देवीचा यात्रोत्सव कवठे येमाई येथे शनिवार (दि. १२) व रविवार (दि. १३) रोजी पार पडणार आहे. या यात्रेला पुणे, मुंबई, नाशिकसह विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यात्रेनिमित्त धार्मिक पूजन सोहळे, भजन-कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कान्हूर मेसाईतील मेसाई देवी यात्रोत्सवही रंगणार…

कान्हूर मेसाई येथील आराध्य देवी श्री मेसाई देवीच्या यात्रोत्सवासाठीही जय्यत तयारी सुरू असून, हा उत्सव रविवार (दि. १३) व सोमवार (दि. १४) रोजी साजरा होणार आहे. या यात्रेत परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. पारंपरिक रितीरिवाज, धार्मिक पूजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे या यात्रेचे वैशिष्ट्य ठरणार आहेत. या यात्रांमुळे गावात उत्सवाचे वातावरण तयार झाले असून, श्रद्धा, परंपरा आणि उत्साह यांचा संगम अनुभवायला मिळत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

13 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago