शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात पाटबंधारे तसेच महसूल खात्याच्या परवानगीशिवाय घोड धरणाच्या लगत असणाऱ्या अॅड विनायक लक्ष्मणराव फडके यांच्या शेतजमिनीतुन तसेच घोड धरणाक्षेत्रातुन विनापरवाना माती उपसा करुन त्याची विक्री केली. हा प्रकार विनायक फडके यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिरुरचे तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती.
परंतु या प्रकरणात एका ‘स्वयंघोषित’ नेत्याने मातीचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेत राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धाव घेत थेट शिरुरच्या तहसिलदारांवर तसेच पोलिस निरीक्षक यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची महसुलमंत्र्याकडे तक्रार करत त्यांच्या कामात अडथळा आणला.
दुसऱ्या प्रकरणात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीचे काम सुरु असुन या कामात महसूल खात्याची कोणतीही परवानगी नसताना बेसुमार अवैध मुरुम उत्खनन केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी याबाबत थेट तहसीलदारांकडे तक्रार केली. त्यानंतर तक्रारदाराला थेट दुसऱ्या स्वयंघोषित नेत्याचा फोन आला. त्याने तुम्ही त्या कंपनीची तक्रार का केली. त्या कंपनीच काम मी करतोय तिथं लक्ष घालु नका असा धमकीवजा इशारा या सामाजिक कार्यकर्त्याला देण्यात आला.
त्यामुळे शिरुर तालुक्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करणे अडचणीचे ठरत आहे. एखादा अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असेल आणि तालुक्यातील स्वयंघोषित नेत्यांच ऐकत नसेल तर एकतर त्यांना ऑफिसमध्ये बोलावून घ्यायचं त्यांना खालच्या भाषेत एकेरी बोलायचं अपमान करायचा असा प्रकार सध्या शिरुर तालुक्यात सुरु आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच मानसिक खच्चीकरण होत असुन त्याचा आमच्या कामावर परिणाम होत असल्याचे एका अधिकाऱ्याने ‘नाव’ छापण्याच्या अटीवर सांगितले.
आमदार रोहित पवार यांनी विना परवाना गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेघा इंजिनिअरिंगचा ९० कोटींचा दंड माफ केल्याचा आरोप केला होता. त्यावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी पुरावे द्या अन्यथा राजकीय सन्यास घ्या असे प्रतिआव्हान रोहित पवारांना दिले होते.
त्यानंतर आमदार रोहित पवारांनी विना परवाना गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी मेघा इंजिनिअरिंगचा ९० कोटींचा दंड माफ केल्याचा थेट पुरावाच सादर केल्याने महसूलमंत्री बावनकुळे यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यातील अवैध गौण खनिज प्रकरणातही असाच काही प्रकार तर झाला नाही ना अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
(क्रमश:)
शिरूर! मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या नावाचा वापर करुन स्वयंघोषित नेते धरतात अधिकाऱ्यांना वेठीस…?
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…