शिरूर (तेजस फडके) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘दादागिरी’ च्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. अजित पवार यांच्यावर टिकेची झोड उठल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा माझा उद्देश होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांचा बेधडकपणा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या बेडधक बोलण्यामुळे यापूर्वीही अनेकवेळा अडचणीत आलेले आहेत. परंतु, आत्ता DYSP अंजना कृष्णा (IPS) प्रकरणात अजित पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे अडचणीत आले आहेत. इप्स अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्या संभाषणाचा व्हिडिओ काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिकेची झोड उठली.
शिरूर तालुक्यातील परिस्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही. शिरूर तालुक्यातील काही ‘स्वयंघोषित नेते’ मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आमचे घनिष्ठ संबंध आहेत, असे सांगत प्रांत, तहसिलदार, DYSP, पोलिस निरीक्षक यांच्यावर दबाव टाकुन सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. विशेष म्हणजे सध्या जे ‘स्वयंघोषित नेते’ अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. ‘स्वयंघोषित नेत्यांची’ राजकारणात येण्यापुर्वीची पार्श्वभुमी पाहिली तर ते गुन्हेगार होते. काही वर्षांपुर्वी शिरुर तालुक्यातून त्यांना ‘तडीपार’ करण्यात आले होते. परंतु, बक्कळ पैसा कमावल्यानंतर त्यांनी विविध पक्षात प्रवेश करत ‘वाल्या चे वाल्मिकी’ झाले आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतीत त्यांनी आपल्या पुर्वीच्या ‘गुन्हेगारी’ पार्श्वभूमीचा वापर करत वेगवेगळ्या कंपनीत ठेके मिळवले. त्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले आहेत.
राजकारणात सक्रीय झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करुन नेत्यांची हुजरेगिरी करत त्या पक्षात स्वतःच स्थान बळकट केले. त्यानंतर पक्षातल्याच काही नेत्यांना हाताला धरुन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी जवळीक साधली. त्यानंतर अनेकवेळा शिरुर तालुक्यातील अनधिकृत माती उपसा, मुरुम उपसा, वाळू उपसा यावर महसूल किंवा पोलिस खात्यातील अधिकारी कारवाईसाठी गेले की हेच ‘स्वयंघोषित नेते’ आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महसूलमंत्री यांच्या जवळ आहोत, असा दबाव टाकत अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी पासून थांबवत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
(क्रमश:)
बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम
Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी
म्हणून अजित पवार यांना ‘दादा’गिरी अंगलट…
फडणवीस सरकारमधील या मंत्र्याला गुणरत्न सदावर्ते यांचे ओपन चॅलेंज, थेट म्हणाले…