शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापुर (ता. शिरुर) येथे रविवार (दि 25) पुणे- नगर महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद आणि हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिले आहे.
शिक्रापूर येथे शिवसेना ठाकरे गट, युवा सेना, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार, युवासेना तालुका प्रमुख विजय लोखंडे, अमोल हरगुडे, वैभव ढोकले, महिला आघाडी तालुका प्रमुख चेतना ढमढेरे, वंदना ढमढेरे, उपतालुका प्रमुख नितीन दरेकर, नानाभाऊ गिलबिले, नितीन मुळे, राहुल शिंदे, संतोष भोंडवे, अनिल पवार, सुनील जाधव, सुजित विरोळे, आकाश सुर्वे, स्वप्नील रेड्डी, उत्तम कान्हूरकर, बाळासाहेब दाते, अतुल विश्वासे, विकास नरके, सत्यवान हरगुडे, अनिल सातकर, संतोष झरे, अक्षय पवार, राहुल रणधीर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद व हिंदुस्तान जिंदाबाद यांसह आदी घोषणा देत आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार, युवासेना तालुका प्रमुख विजय लोखंडे, महिला आघाडी तालुका प्रमुख चेतना ढमढेरे यांनी तीव्र शब्दात मनोगत व्यक्त केले तर यावेळी बोलताना पीएफ आय संघटनेने खुलेआम घोषणा दिल्या असून खुलेआम अशा घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार यांनी दिला आहे. यावेळी शिवसैनिकांच्या मागण्यांचे निवेदन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांना देण्यात आले.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…