थेट गावातून

मोटेवाडी येथे रब्बी हंगामाच्या पुर्व तयारी निमित्ताने कार्यशाळा

शिरुर (तेजस फडके) मोटेवाडी (ता. शिरुर) येथे कृषि विभागाच्या वतीने घटस्थापनाची शासकीय सुट्टी असतानाही शेतकरी कार्यशाळा पार पडली. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने रब्बी हंगाम प्रशिक्षण मोहीम अंतर्गत रब्बी हंगाम पुर्व तयारी प्रशिक्षण तसेच कांदा लागवड तंत्रज्ञान आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना हवामान आधारित फळपिक विमा योजना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ठिबक सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना अंतर्गत भाजीपाला किट वाटप कार्यक्रम अशा विविध योजनाची माहिती कृषी सहायक जयवंत भगत यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली.

कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे यांनी हॉर्टीसॅप योजनेअंतर्गत डाळींबावरील किड व रोग बाबत माहिती दिली व कांदा लागवड तंत्रज्ञान सांगताना रोपवाटिका व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक कांतीलाल वीर यांनी रब्बी ज्वारी तंत्रज्ञान बाबत माहिती दिली. तसेच यावेळी शेतकऱ्यांना पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना अंतर्गत भाजीपाला किट वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपसरपंच जीवन जासुद यांनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमास माजी सरपंच रोहन गवळी, लक्ष्मण कोल्हे,रामभाऊ शिंदे, दशरथ कोल्हे, बाजीराव येलभर, गणेश कोल्हे, अतुल कोल्हे, निलेश येलभर, लहु शिंदे, दगडु गवळी, दत्ता कोल्हे, रमेश जासुद, सौरभ येलभर, सुहास येलभर, शाम येलभर यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार गणेश कोल्हे यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

17 तास ago

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना…

19 तास ago

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या…

22 तास ago

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान…

1 दिवस ago

Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात.…

1 दिवस ago

वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल

कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर…

1 दिवस ago