crime
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून तब्बल ३२ हजार रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानसिंग जगदीश नेवसे (वय ३५, रा. छत्रपती कॉलनी, शिरुर) यांनी फिर्याद दिली असून, शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना दि. ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ५ मे रोजी पहाटे २.४१ च्या दरम्यान घडली. विज वितरण कंपनीचे कार्यालय नियमितप्रमाणे ४ मे रोजी बंद करून कर्मचारी घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी ५ मे रोजी सकाळी ९ .३० वाजता कार्यालय उघडल्यानंतर सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांच्या लक्षात आले की, कार्यालयाबाहेर ठेवलेला अल्युनियम कंडक्टर आणि १२० एम.एम. केबल गायब आहे. तत्काळ CCTV फुटेज तपासण्यात आले असता, ५ मे च्या रात्री २:३० वाजता एक अनोळखी इसम मोटारसायकलवर येऊन कार्यालयाच्या परिसरात प्रवेश करताना व चोरलेला माल मोटारसायकलवर बांधून नेताना दिसून आला.
चोरीस गेलेल्या मालामध्ये अंदाजे २८ हजार रुपये किमतीचा अल्युनियम कंडक्टर आणि १२ हजार रुपये किमतीच्या १२० एम.एम. केबल यांचा समावेश असून एकूण मालाची अंदाजित किंमत ३२ इतकी आहे. संबंधित माल परवानगीशिवाय नेल्यामुळे संबंधितावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार खेडकर करत असून, CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. शिरूर पोलीस अधिक तपास करत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन मारहाण; दोन जणांवर गुन्हा दाखल
शिरुर; कारभारणीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या ‘महाशयां’ च्या पाठीमागचा ‘आका’ नक्की कोण…?
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…
रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर…