शिरुर; कारभारणीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या ‘महाशयां’ च्या पाठीमागचा ‘आका’ नक्की कोण…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये कारेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या अनेक कंपन्यामधील दुसऱ्यांच्या कामात कारभारनीच्या नथीतुन तीर मारत लुडबुड करणाऱ्या ‘महाशयां’ च्या पाठीमाचा ‘आका’ हा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचा बडा नेता असल्यामुळे रांजणगाव MIDC त अनेकांची कामे तोडण्याचा सपाटाच या महाशयांनी लावला असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

 

रांजणगाव MIDC त अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. या कंपन्यामध्ये विविध प्रकारचे कामाचे ठेके निघतात. कारेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या अनेक कंपन्यामध्ये बांधकाम, लेबर तसेच स्क्रॅप असे विविध कामाचे ठेके निघाल्यानंतर स्थानिक व्यक्तींनी जरी ते काम मिळवलं तरीही हे ‘महाशय’ त्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकत त्या कामाचा ठेका स्वतःच्या किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या नावावर घेतात. त्यामुळे कारेगाव मधीलच कितीतरी स्थानिक लोकांना MIDC काम मिळणे मुश्किल झाले आहे.

 

या ‘महाशयां’ च्या पाठीमागचा ‘आका’ नक्की कोण…?

कारभारणीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या या ‘महाशयां’ नी कारेगाव ग्रामपंचायतच्या कारभारात चार वर्षे ढवळाढवळ केली. त्याच दरम्यान पत्नीच्या पदाचा गैरवापर करत अनेक कंपन्याना वेठीला धरत कामे मिळवली. परंतु हे सगळं करत असताना या ‘महाशयां’ ना राजकीय पाठबळ देणारा ‘आका’ हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

 

सध्या राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु हे ‘महाशय’ सत्ताधारी पक्षातील लोकांनाही सोडत नसल्याचे चित्र आहे. शिवाय या महाशयांना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकही लढवायची आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत गावातील नाराज कार्यकर्ते त्यांच्या विरोधात मैदानात उतरणार की त्यांच्याशी हातमिळवणी करणार…? हे येणारा काळचं ठरवेल.

(क्रमश:) 

रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?

शिरुर; कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या महिला सरपंचाच्या पतीची मेहुण्याच्या नावावर MIDC मध्ये दहशत…?

शिरुर; चार वर्षात सरपंच फक्त नामधारी ग्रामपंचायतच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्या ‘महाशयां’ चीचं लुडबुड…?