शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरात दिवसेंदिवस सोनं साखळी चोरीचे प्रमाण वाढतं असुन रस्त्यावररुन जाणाऱ्या महिलेला लक्ष्य करत दोन अनोळखी व्यक्तींनी जबरी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. ५ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:४० च्या दरम्यान शिरुर येथील पाबळ फाटा ते रामलिंग रोडवरील वॉशिंग सेंटरच्या समोर घडली.
याबाबत त्रिवेणी शशिकांत गोळे (वय ३५) रा. श्री हाईट्स, रामलिंग रोड, शिरुर या आपल्या दुचाकीवरुन घरी जात असताना एका हिरव्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर आलेल्या अंदाजे २० ते २५ वयोगटातील दोन अनोळखी युवकांनी त्यांचे सुमारे दोन तोळ्यांचे (अंदाजे किंमत १ लाख ४० हजार) सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावले आणि घटनास्थळावरुन पसार झाले.
त्यानंतर फिर्यादीने तातडीने शिरुर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…