न्हावरे (तेजस फडके): कुरुळी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत चर्मकार वस्ती रोडच्या कामासाठी बनावट बिल तयार करत शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच प्रतीभा बोरकर आणि शहनाज पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी विष्णु लक्ष्मण गाडीलकर (वय ५४, रा. टाकळी हाजी, सध्या रा. सॉलीटीअर बिल्डींग, फ्लॅट क्र. २०४, बिजे कॉर्नर, शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ०४ जून २०१८ ते १५ जुलै २०२१ दरम्यान कुरुळी ग्रामपंचायत हद्दीतील चर्मकार वस्ती रोडच्या कामासाठी न्यू साईराज ट्रेडर्स या फर्मचे बनावट बिल (चलन क्र. ३७५०) तयार करण्यात आले. या बिलाच्या आधारे सरपंच प्रतीभा प्रमोद बोरकर व शहनाज अरीफ पठाण यांनी रु. १ लाख ३१ हजार २०० एवढी रक्कम न्यू साईराज ट्रेडर्स यांना अदा केली. याशिवाय, या फर्मकडील जीएसटी बिल नं. ५३७ आणि ४६५ सुद्धा बनावट असून त्यावर जीएसटी भरलेले नाही.
तसेच कामावर लावलेल्या मजुरांच्या हजेरीवर खाडाखोड करून फक्त सुरज दशरथ भोईटे यांच्या नावावर रु. २४ हजारचा धनादेश दिला गेला. एकुण रु. १ लाख ५५ हजार २०० रुपयेचा बनावट खर्च दाखवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला असुन या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात दि ६ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते हे पुढील तपास करत आहेत.
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…