मुख्य बातम्या

केंदूर मध्ये महिलेला दिवसाढवळ्या चाकूच्या धाकाने लुटले

शिक्रापुर (शेरखान शेख) केंदूर (ता.शिरुर) येथील पऱ्हाडवाडी येथे दिवसा ढवळ्या दोन युवकांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून चाकूच्या धाकाने महिलेला लुटल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

केंदूर येथील पऱ्हाडवाडी मधील दिव्या पऱ्हाड हि महिला घरात असताना दोन युवक घराच्या दारात आले. त्यांनी दिव्या यांना आवाज देत येथे आल्हाट नावाची व्यक्ती राहते का आम्ही गाडीचा हप्ता वसूल करायला आलो आहे असे म्हणून घरात आले. घरात येताच त्या दोघा युवकांनी दिव्या व दिव्याची सासू या दोघांना चाकू दाखवून आवाज केला तर तुझे काही खरे नाही अशी धमकी देत त्यांच्या अंगावरील मंगळसूत्र, कर्णफुले आदी सोन्याचे दागिने काढून घेत दोघांनी पोबारा केला. घडलेल्या प्रकाराने दोन्ही महिला भयभीत झाल्या.

त्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत दिव्या मयूर पऱ्हाड (वय २१) रा. पऱ्हाडवाडी केंदूर ता. शिरूर जि. पुणे या महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

17 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago