रांजणगाव गणपती (तेजस फडके) काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव MIDC हद्दीतील गावांच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष गावातील पदाधिकारी तसेच पोलीस पाटलांची आज (दि 23) रोजी शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांच्या अध्यक्षतेखाली रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. त्यावेळी पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे उपस्थित होते.
यावेळी बोलताना यशवंत गवारी म्हणाले, गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक नेमावेत, मंडप टाकताना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी, समाज प्रबोधनपर देखावे सादर करावेत, तसेच मोठया गणेश मंडळांनी उत्सवाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी CCTV बसवावेत आणि कोणत्याही व्यक्तीस वर्गणीची सक्ती करु नये अशा सुचना गवारी यांनी यावेळेस सर्वांना दिल्या.
या बैठकीला रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातुन 80 ते 90 जण उपस्थित होते. पोलीस अंमलदार ब्रम्हा पोवार यांनी सूत्रसंचालन केल तर विलास आंबेकर यांनी आभार मानले.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…