आरोग्य

वजन वाढवण्यासाठी 10 टिप्स

वजन वाढवण्यासाठी हेवी स्ट्रेंथ ट्रेनिंगसह हाय कॅलरी इनटेक कॉम्बिनेशन महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय इतरही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपण फॉलो करु शकतो.

1) जेवण्यापूर्वी पाणी पिऊ नये कारण त्यामुळे तुमचं पोट भरतं आणि तुम्हाला हवी असलेली कॅलरी मिळवणं कठीण होऊ शकतं.

2) जितकं जास्त खाता येईल, तितकं खावं. अगदी झोपण्यापूर्वी एक अतिरिक्त नाश्ता तुम्ही करू शकता.

3) दूध प्या. तहान घालवण्यासाठी दूध प्यावं. यामध्ये अधिक गुणवत्तेचे प्रोटीन तर असतातच पण यातून कॅलरी मिळवणं अधिक सोपं होतं.

4) वजन वाढवता येणारे शेक प्यावेत. खरंच तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही वजन वाढवणारे शेक नक्की प्या. यामध्ये हाय प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरी असतात.

5) मोठ्या डिश घ्या. तुम्हाला अधिक कॅलरी मिळवायची असल्यास, मोठ्या डिशचा उपयोग करावा. कारण लहान डिशमध्ये जेवण सहसा कमी घेतलं जातं.

6) आपल्या कॉफीमध्ये क्रीम घालून घ्या. जास्त कॅलरी मिळवण्यासाठी हा सोपा उपाय आहे.

7) मसल्स बिल्डिंग सप्लिमेंट क्रिएटन खा. क्रिएटिन मोनोहायड्रेट तुमच्या मांसपेशींचं वजन वाढवू शकतं.

8) व्यवस्थित झोप घ्या. मांसपेशी वाढवण्यासाठी भरपूर झोप घेणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

9) पहिले प्रोटीन आणि भाज्या खाव्यात. तुमच्या प्लेटमध्ये सर्व तऱ्हेचे खाद्यपदार्थ असल्यास, पहिल्यांदा तुम्हाला कॅलरीयुक्त आणि प्रोटीनयुक्त आहार घेणं गरजेचं आहे, त्यानंतर सर्वात शेवटी भाज्या खा.

10) धुम्रपान करु नका. धुम्रपान करणाऱ्यांचं वजन हे धुम्रपान न करणाऱ्यांपेक्षा कमी असतं आणि धुम्रपान सोडल्यानंतर बऱ्याचदा वजन वाढतं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

9 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

24 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago