आरोग्य

लिव्हर खराब झाल्याचे संकेत देतात साधी वाटणारी ५ लक्षण

दरवर्षी १९ एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचं कारण लिव्हर संबंधित आजारांबाबत जागरूकता पसरवणं हे आहे. लिव्हर पचन, इम्यूनिटी, मेटाबॉलिझ्म आणि शरीरातील पोषक तत्वाचे भंडार आहे. लिव्हर पित्ताचं उत्पादनं वाढवते ज्यामुळे फॅट्स कमी होण्यात मदत होते. यामुळे रक्तातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीरात ब्लड फ्लो व्यवस्थित राहण्यासाठी लिव्हरचं कार्य सुरळीत असणं फार गरजेचं आहे. अन्यथा शरीरात उर्जा आणि पोषक तत्वाची कमतरता भासते.

लिव्हरची योग्य पद्धतीनं काळजी घेतली नाही तर ते कमी वयातच डॅमेज होऊ शकतं. यामुळे फॅट लिव्हरची समस्या उद्भवू शकते. अशा स्थितीत फॅट्सचे प्रमाण अधिक असते. जास्तीत जास्त लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून येत नाही. फॅटी लिव्हरची काही लक्षणं चेहऱ्यावरही जाणवतात. त्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे.

चेहऱ्यावर सूज येण…

लिव्हरमध्ये बिघाड झाल्यानं प्रोटीन तयार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे रक्तप्रवाह आणि तरल पदार्थ बाहेर काढणं कठीण होतं. यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते.

मान काळी पडण…

फॅटी लिव्हरच्या आजारामुळे इंसुलिन रेसिस्टंट वाढू शकते. यामुळे जास्त प्रमाणात इंसुलिन तयार होते. इसेंथेसिस नायग्रिकन्सचे विकार वाढतात. अशा स्थितीत त्वचा आणि मानेचा भाग काळा पडतो.

रोजेशिया…

प्रकाशित झालेल्या संशोधनाननसार रोजेशिया एक स्किनचा आजार आहे. ज्यात त्वचेवर लाल चट्टे पडतात. तर काहीवेळा पांढरे डागही पडतात. यामुळे फॅटी लिव्हरचा आजार होत नाही. पण हे त्वचेच्या आजाराचे संकेत असू शकतात.

चेहऱ्यावर दाणे येण…

फॅटी लिव्हर डिजीसमुळे पोषक तत्वांवर याचा परिणाम जाणतो. यामुळे झिंकची कमतरता जाणवते. यामुळे त्वचेवर दाणे येण्याची समस्या उद्भवते. फॅटी लिव्हरच्या आजारात शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यासह त्वचेला खाज सुटू शकते.

तुमची त्वचा पिवळी पडू शकते आणि डोळे पांढरे होऊ शकतात. कावीळची लक्षणे शरीराच्या इतर भागात पसरण्याआधी डोळ्यांत आणि चेहऱ्यावर दिसतात. जेव्हा यकृत योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा लाल रक्तपेशी तुटू शकतात, ज्यामुळे बिलीरुबिन आणि कावीळ तयार होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

1 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

15 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

15 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

16 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

16 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

16 तास ago