मुख्य बातम्या

…म्हणून ३५ बुलेट सायलेन्सर वर शिरूर पोलिसांनी फिरवला बुलडोझर

शिरूर पोलीस स्टेशन वाहतुक शाखेची धडाकेबाज कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामधील कॉलेज, शाळा, बस स्टैंड व गर्दीचे ठिकाणी बुलेट सायलन्सर मधुन फटाके फोडणा-या, कर्कश आवाज करणा-या चालकांवर व बुलेट सायलेन्सस्वर कारवाई करण्याचे आदेश शिरूर पोलीस स्टेशन वाहतुक शाखेला देवुन त्या अनुशंगाने वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार विरेंद्र सुंभे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम, पोलीस अंमलदार ज्ञानदेव गोरे, पोलीस अंमलदार विकी मैंद यांचे पथक तयार केले.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार विरेंद्र सुंभे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम, पोलीस अंमलदार ज्ञानदेव गोरे, पोलीस अंमलदार विकी मैद यांनी शिरूर शहरामधील कॉलेज, शाळा, बस स्टॅन्ड, गर्दीचे ठिकाणी गस्त करून कारवाई करत एकूण ३५ बुलेट मोटारसायकल ताब्यात घेवुन त्यांचे कर्कश आवाज करणारे ३५ सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. दिनांक १८ मार्च रोजी वरील जप्त करण्यात आलेल्या कर्कश आवाज करण्या-या ३५ बुलेट मोटारसायकलचे साईलेन्सरवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, यांना शिरूर शहरमधील महाविदयालय, शाळा परीसरामध्ये गस्त घालण्याचे आदेश देवुन महाविदयालयीन मुलींच्या अडचणी जाणून घेणे, तसेच रोडरोमीयो यांचेवर कडक कारवाई करण्याबाबत सांगीतले आहे.

शिरूर पोलीस स्टेशन शहर व ग्रामीण भागामधील चार चाकी वाहनांचे काळया काचांचे फिल्मींग असल्यावर त्यांचेवर दंडात्मक कारवाई करून गाडीच्या काचेचे फिल्मीग जागेवरच फाडण्यात येणार असल्याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगीतले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

4 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago