आरोग्य

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र ABC ज्यूस

हिवाळ्यात शरीराची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. तापमानात घट झाल्यामुळे संसर्गासह अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात.

ABC ज्यूसचं सेवन केल्याने अशा परिस्थितीत तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. सफरचंद, बीट, गाजर, थोडं मीठ, आलं आणि लिंबू मिसळून ABC ज्यूस तयार केला जातो.

ABC ज्यूसध्ये भरपूर जीवनसत्त्वं, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे हिवाळ्यात शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.

इम्यूनिटी वाढते

ABC ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे सफरचंद आणि गाजरांमध्ये आढळतं, ज्यामुळे इम्यूनिटी वाढते. तसेत शरीराला बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून लढण्यास मदत करतं. हिवाळ्यात सर्दी आणि फ्लूपासून बचाव होतो.

त्वचेची चमक वाढते

हिवाळ्यात त्वचा अनेकदा कोरडी होते. अशावेळी ABC ज्यूसमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेची काळजी घेतात. हे त्वचेला हायड्रेटेड आणि ग्लोइंग ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हिवाळ्यातही तुमचा चेहरा तजेलदार दिसतो.

पचनक्रिया सुधारते

ABC ज्यूसमधील गाजर आणि बीट दोन्हीमध्ये भरपूर फायबर असतं, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. हा ज्यूस बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करण्यास मदत करतो आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करतो. या ज्यूसमुळे पोट हलकं राहून पचनक्रिया संतुलित राहण्यास मदत होते.

एनर्जी लेव्हल वाढते

हिवाळ्यात, शरीराला अनेकदा थकवा जाणवतो आणि एनर्जी लेव्हल कमी होऊ शकते. ABC ज्यूसमध्ये साखरेचा नैसर्गिक स्रोत असतो. ज्यामुळे शरीराला त्वरित एनर्जी मिळते. हा ज्यूस शरीर दिवसभर एक्टिव्ह ठेवण्यास मदत करतो.

वजन कमी करण्यास उपयुक्त 

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ABC ज्यूस खूप फायदेशीर ठरतो. गाजर आणि बीट सारख्या घटकांमध्ये कॅलरीज कमी असतातच, पण त्यामध्ये भरपूर फायबर देखील असतात, जे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ABC ज्यूसमुळे मेटाबॉलिज्म वाढतं आणि फॅट बर्न होण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळेच लठ्ठपणा कमी करायचं असल्यास ABC ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो.

कधी प्यायचा एबीसी ज्यूस

एबीसी ज्यूसचा फायदा व्हावा असं वाटत असेल तर रोज एक ग्लास हा ज्यूस प्या. सकाळी उपाशीपोटी हा ज्यूस प्यायल्यास अधिक चांगला परिणाम होऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

7 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

7 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

1 दिवस ago