शिरूर तालुका

वृद्ध महिलेला मिळाले न्यायाचे मंगळसूत्र; शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना शिरूर पोलीसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता व कर्तव्यदक्षता सिद्ध केली आहे. पायी चालणाऱ्या ७७ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील दिड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांकडून पोलीसांनी सदर मंगळसूत्र हस्तगत करून ते न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ मालकिणीच्या सुपूर्त केले आहे.

ही घटना दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. मौजे संविदणे (ता. शिरूर) गावच्या हद्दीत मलठण–नारायणगाव अष्टविनायक हायवे रोडवरील बंटी हॉटेलच्या पुढे असलेल्या रस्त्यावरून धुमाळस्थळाकडे चाललेल्या वस्त्सलाबाई दत्तात्रय सुके (वय ७७, रा. खडकवाडी, ता. आंबेगाव) या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दिड तोळ्याचे, अंदाजे १,१०,०००/- रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन अज्ञात इसमांनी जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकलवरून पलायन केले होते.या घटनेनंतर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक दिपक करांडे आणि पोलीस अंमलदार भाउसाहेब ठोसरे यांनी तपासाची चोख भूमिका बजावत, आरोपी १) अनिल सोमनाथ गव्हाणे आणि २) अनिल नारायण गव्हाणे (दोघेही रा. गव्हाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले मंगळसूत्र जप्त केले.

प्रकरणातील जप्त मंगळसूत्र न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक ३० जून २०२५ रोजी वस्त्सलाबाई दत्तात्रय सुके यांना अधिकृतपणे सुपूर्त करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीमागे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तसेच शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. कारवाईमध्ये पोलीस हवालदार बापु मांगडे आणि पोलीस अंमलदार भाउसाहेब ठोसरे यांचे मोलाचे योगदान राहिले. शिरूर पोलिसांची ही तातडीने व काटेकोर केलेली कारवाई समाजात सुरक्षिततेचा विश्वास वाढवणारी ठरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

8 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

9 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

13 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

18 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 दिवस ago