आरोग्य

तुम्ही स्प्लिट एंड्समुळे त्रस्त झालेले आहात, ‘हे’ हेअर ऑइल तुमची समस्या करेल दूर

केसांची काळजी घेताना आपण अनेकदा अनेक चुका करतो, ज्यामुळे आपल्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कोरडेपणा, केस गळणे, निस्तेजपणा आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे स्प्लिट एंड्सची. दुतोंडी केसांमुळे केसांची वाढ थांबतेच पण केस कमकुवत आणि निर्जीव देखील होतात. त्यामुळे अनेकजण या समस्येला कंटाळून वारंवार केस कापत राहतात. पण स्प्लिट एंड्सपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वारंवार केस कापणे योग्य नाही यासाठी योग्य पद्धतीने केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे. जर तुम्ही केसांची योग्य निगा राखली आणि काही खास हेअर ऑईलचा वापर केला तर स्प्लिट एंड्सची समस्या कमी होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला काही हेअर ऑइलबद्दल सांगणार आहोत जे केसांना पोषण देतात, आणि स्प्लिट एंड्सची समस्या दूर करण्यास मदत करतात.

1) नारळाचे तेल

नारळाचे तेलामध्ये लॉरिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केसांना मुळापासून ते शेवटपर्यंत पोषण देतात. तसेच नारळाचे तेल तुमच्या स्कॅल्पला हायड्रेट करतात आणि केसांची आर्द्रता रोखून ठेवतात जेणेकरून स्प्लिट एंड्सची समस्या कमी होते. झोपण्यापूर्वी तुम्ही केसांना कोमट खोबरेल तेलाने मसाज करा आणि रात्रभर राहू द्या. आठवड्यातून 2-3 वेळा खोबरेल तेल लावल्याने केस मजबूत आणि निरोगी होतात.

2) बदाम तेल

बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात, जे केसांची आतून दुरुस्ती करतात. स्प्लिट एंड्स कमी करण्यासोबतच ते केसांना चमकदार आणि मऊ बनवतात. आठवड्यातून दोनदा बदामाच्या तेलाने मसाज करा आणि 2 तासांनी सौम्य शाम्पूने धुवा.

3) कॅस्टर ऑईल

कॅस्टर ऑईलमध्ये रिसिनोलिक ॲसिड असते, जे केस तुटण्यास प्रतिबंध करते आणि स्प्लिट एंड्स बरे करण्यास मदत करते. तसेच तुम्ही कॅस्टर ऑईल नियमित लावल्यास केसांची वाढ वाढवते आणि केस दाट बनवते.कॅस्टर ऑईल खूप घट्ट असते त्यामुळे ते नेहमी नारळाचे तेल किंवा बदामाच्या तेलात मिसळून वापरावे. आठवड्यातून एकदा हे तेल लावल्याने केस निरोगी आणि मजबूत होतील.

4) ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑइलमध्ये जीवनसत्त्वे ए आणि ई असतात, जे केसांची मुळे मजबूत करून कोरडेपणा कमी करतात. ऑलिव्ह ऑईल केसांना डीप कंडिशनिंग देते आणि स्प्लिट एंड्सची समस्या दूर करते. यासाठी तुम्ही जेव्हा केसांना शॅम्पू करणार तेव्हा 1 तास आधी ऑलिव्ह ऑइलने मसाज करा आणि नंतर सौम्य शाम्पूने धुवा.

5) आर्गन ऑईल

आर्गन ऑइलला “लिक्विड गोल्ड” म्हटले जाते कारण ते केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे फ्रिजीनेस नियंत्रित करते, केस मऊ करते आणि स्प्लिट एंड्स कमी करते. शॅम्पू लावल्यानंतर केसांच्या टोकांवर २-३ थेंब टाकून तसेच ठेवा. हे केसांना उष्णतेमुळे होणारे नुकसान आणि तुटण्यापासून वाचवते.

हेअर ऑइल कसे लावायचे

केसांना हलक्या कोमट तेलाने मुळापासून टोकापर्यंत मसाज करा. केसांना रात्रभर तेल लावणे जास्त फायदेशीर आहे. घाईत असाल तर किमान २-३ तास ​​तेल केसांना लावून ठेवा. आठवड्यातून 2-3 वेळा तेल लावा जेणेकरून केसांना पूर्ण पोषण मिळेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

8 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

8 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

8 तास ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

8 तास ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

10 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

12 तास ago