आरोग्य

लठ्ठपणा ची समस्या

लठ्ठपणा ही समस्या कमी आणि आजार जास्त वाटू लागला आहे. कारण दर २ माणसामागे एका माणसाचं एकतर पोट सुटलेलं असतंच. हळूहळू हा लठ्ठपणा एव्हढा वाढतो की अगदी जिवावर सुध्दा बेततो. ही समस्या आजच्या काळातील सामान्य समस्यांपैकी एक आहे. या समस्येचं मूळ कारण आहे ते असंतुलित जीवनशैली. पण काही प्रकरणांमध्ये, लठ्ठपणा हा मेडिकल कंडीशन मूळे असू शकतो.

शरीरात गरजेपेक्षा जास्त चरबी जमा झाली की आरोग्याची वाट लागली म्हणून समजा. म्हणून आजकाल लोक बारीक सारीक राहण्याकडे जास्त लक्ष देतात. पण त्यातही चुका करतात आणि मग अधिक लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. कधी कधी कमी वयातच हा लठ्ठपणा जडतो आणि वयाप्रमाणे वाढत जातो. त्यामूळे एकतर योग्य वयात लठ्ठपणावर नियंत्रण मिळवा आणि वजन कमी करताना चुका करू नका. वजन जितकं झपाट्याने वाढतं तितक्या झपाट्याने कमी होत नाही हे एक सार्वजनिक दुःख आहे. वजन कमी होण्यासाठी बराच काळ मेहनत करावी लागते. त्यात जर मेडिकल कंडीशन मूळे लठ्ठपणा असेल तर आणखी कठीण परिश्रम घ्यावे लागतात. अशा वेळी मुख्य करून वेलनेस कोच च्या टीप्स वर पूर्ण फोकस ठेवा.

१) कितीही खा, काहीही खा पण कॅलरी वाढू देऊ नका

बहुतेक लोकांना वाटतं की आपण काहीही नाही सगळं काही खाऊ शकतो. या नादात ते अनेकदा कॅलरीची मर्यादा पार करतात आणि त्यांना कळतही नाही. जोपर्यंत तुम्ही कॅलरीची मर्यादा ओलांडणे बंद करत नाही तोपर्यंत तुमचं वजन आटोक्यात येणं अशक्य आहे. त्यामुळे पॅक्ड फूड्स, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि कमी पौष्टिक पदार्थ आपल्या आहारातून वगळणे आवश्यक आहे. अधिक प्रक्रिया केलेले पदार्थ पेशींचे वय गतीने वाढवतात. कारण यामध्ये हायड्रोजनेटेड तेल जास्त प्रमाणात असतात. हे ट्रान्स फॅट्सने भरलेले असल्यामुळे शरीरातील सूज वाढवतात. यामुळे पेशी खराब होण्याची शक्यता वाढते.

२) नुसतं प्रोटिन खाऊ नका

साधारणपणे वाढते वजन रोखण्यासाठी प्रामुख्याने आहारात अधिक प्रोटीन खाल्ले जाते. जे अत्यंत चुकीचे आहे. वाढत्या वजनाचा संबंध हा तुम्ही खात असलेल्या कॅलरीजशी असतो. त्यामुळे पुरेसे प्रोटिन घेतल्याची खात्री करणे आवश्यक असते. शिवाय आपले वजन कमी करण्या सोबतच प्रथिनांची कमतरता हे वय वाढण्याचेही मुख्य कारण ठरते. जास्त प्रमाणात प्रोटिनचे सेवन केल्याने शरीर बारीक राहण्यास मदत होते. पण प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायूंचे नुकसान होते आणि परिणामी चयापचय शक्ती लोप पावते. यामुळे हाडांचे नुकसान होते. त्यामुळे बारीक होण्यासाठी फक्त प्रोटीन खाऊ नका.

3) खाण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करा

आहारात नुसतं प्रोटीन किंवा नुसतं कॅल्शिअम असेल तर कसं चालेल? अनेक लोक बारीक होण्यासाठी फक्त फळं किंवा फळांचा ज्यूस एव्हढाच आहार घेतात. याशिवाय शेक किंवा प्रोटीन बार सारखे खाद्यपदार्थ देखील आहारात समाविष्ट करतात. तर असे पदार्थ कधीतरी खाण्यावर भर द्यावा. याचे कारण म्हणजे, अनेक उत्पादने अत्यंत प्रक्रिया केलेली असतात आणि त्यात साखर भरपूर असते. जास्त साखर दीर्घकालीन रोगाच्या विकासास कारणीभूत ठरते आणि म्हातारपणाकडे वेगाने नेते.

वजन कमी करण्याची पंचःसूत्री 

1) जास्त कॕलरीचा आहार टाळा व कमी कॕलरीचा आहार घ्या. शिवाय तीन वेळा जेवत असाल तर कोणत्याही दोन वेळच्या जेवणांमध्ये ३ ते ४ तासांचे अंतर ठेवा.

2) सकाळी ५ ते ७ या वेळेत किमान एक तास सलग व्यायाम करा. कारण पहिल्या १५-२० मिनिटात ग्लुकोज (साखर) जळते व नंतरच्या ४०-४५ मिनिटात फॕट (चरबी) जळते तेव्हा घाम येत राहतो.

3) नेहमी गरम पाणी प्या. दर तासातासाला एक ग्लास अशा पद्धतीने दररोज ३ ते ४ लिटर पाणी प्या.

4) रात्री हलका आहार घ्या, कमी आहार घ्या. रात्री उशीरा केलेल्या जेवणामुळे फॅट वाढते, त्यामुळे शक्य तेवढे लवकर सातच्या आसपास जेवण करा. तसेच रात्री आहार घेतल्यानंतर शतपावली करा व जेवणाच्या वेळेपासून दोन तासांनी एक ग्लास कोमट पाणी पिऊन झोपी जावे.

5) दिवसातून फक्त दोनच वेळा जेवणे. सकाळी ९ च्या आसपास व संध्याकाळी ७ च्या आसपास. अधून मधून फक्त पाणी किंवा ताक पित राहणे.

असे करण्याने तुमचे वजन नियंत्रणात येईल व ही सवय कायम स्वरुपी लावल्यास वजन सदैव नियंत्रणात ही राहील. ज्याचे वजन थोडेफार वाढले आहे ते कमी करायचे आहे व ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे त्यांनी वरील नियमांचे पालन केल्यास उत्तम फायदा मिळतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

3 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

3 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

3 तास ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

3 तास ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

5 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

7 तास ago