आरोग्य

आरोग्यासाठी बिट फायदेशीर

बीट म्हटलं की आपल्याला रक्त आठवतं. बीट खाल्याने रक्त वाढतं असा लहानपणी समज होता. तो पूर्णपणे चुकीचा नाही. बीट हे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांवर गुणकारी आहे. जसे की उच्च रक्तदाब कमी, मधुमेह, स्मरणशक्ती, इत्यादी. बीटमध्ये आणखी काय काय गुणधर्म आहेत.

आधी बीटमध्ये असलेल्या पोषक घटकांबद्दल जाणून घेऊया

बीटचा रंग लाल असतो कारण त्यात ‘बेटालिन’ हे रंगद्रव्य आढळतं. या गुणधर्मामुळे खाण्याचा रंग तयार करण्यासाठी बीटचा वापर होतो.

1०० ग्राम बीटमध्ये ८७.५८ ग्राम पाणी आणि ४३,००० कॅलरीज असतात.

1) रक्तदाब कमी होतो

बीटमध्ये नायट्रेट असतं. नायट्रेट संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत करण्याचं काम करतं. नायट्रेट हे शरीरात जाऊन नायट्रिक अॅसिडमध्ये रुपांतरीत होतं. नायट्रिक अॅसिडमुळे रक्तवाहिन्य प्रसरण पावत असल्यामुळे रक्तदाब वाढत नाही. रक्तदाब कमी करण्यासाठी बीटचा रस प्यायलास उत्तम.

2) हृदयासाठी गुणकारी

बीटमधला नायट्रेट हा घटक हृदयासाठी पण तेवढाच फायद्याचं असतो. हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका रोखण्याचं काम नायट्रेट करतं. बीटमध्ये असलेले फायबर्स कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराइडला नियंत्रित करण्याचं काम करतात.

3) वजन कमी करण्यासाठी उत्तम

फायबर्स आणि भरपूर प्रमाणातील पाणी यामुळे बीट हे वजन कमी करण्यासाठी उत्तम समजलं जातं. फायबर्स तुमची भूक कमी करण्याचं काम करतात. फायबर असलेलं अन्न घेतल्याने पोट भरलं असल्याचा भास निर्माण होतो. त्यामुळे भूक कमी लागते आणि परिणामी वजन कमी होतं.

4) मेंदू तल्लख होतो

नायट्रेटमुळे मानसिक आरोग्य आणि आकलनशक्ती मजबूत होते. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे नायट्रेटमुळे रक्तवाहिन्या प्रसारण पावतात. रक्तवाहिन्या प्रसारण पावल्यामुळे मेंदूपर्यंत जास्तीतजास्त रक्त पोहोचतं. रक्तपुरवठा सुरळीत झाल्याने मेंदू जोशाने काम करू लागतो.

5) त्वचा तजेलदार दिसू लागते.

बीटरुट्समध्ये विटॅमीन आणि खनिज मोठ्याप्रमाणात असतात. विटॅमीन आणि खनिजांमुळे त्वचा तजेलदार दिसते. तसेच शरीरासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोलेजन प्रथिनांची वाढ होते.

6) डोळ्यांसाठी गुणकारी

बीटमध्ये असलेल्या विटॅमीन A च्या मुबलकतेमुळे मोतीबिंदू होण्याचा धोका टळतो. तसेच वयोमानामुळे येणाऱ्या अंधत्वावर प्रतिबंध लागतो.

7) पचनशक्ती वाढते.

बीटमध्ये असलेले फायबर्स पचनशक्ती सुरळीत ठेवण्याचं काम करतात. पोटात दुखणे, बद्धकोष्ठ सारखे त्रास होत नाहीत.

8) अशक्तपणा कमी होतो.

बीटमध्ये असलेलं लोहाचं प्रमाण अशक्ततणावर (रक्तक्षय) मात करतं. लोह या खानिजामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढून अशक्तपणा कमी होतो. बीटमध्ये असलेल्या विटॅमीन C मुळे लोह जास्तीतजास्त शोषून घेण्यास मदत होते.

९) जळजळ कमी होते

बीटला लाल रंग देणाऱ्या बेटालिन रंगद्रव्यात औषधी गुणधर्म सुद्धा असतात. जळजळ होणे आणि सूज येणे या समस्या बेटालिनमुळे कमी होतात.

१०) कॅन्सरचा धोका कमी होतो

बीटमध्ये असलेल्या बायोअक्टीव्ह कंपाउंडमुळे शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढत नाहीत.बीटच्या या फायद्यावर अजूनही पूर्ण संशोधन व्हायचं आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

30 मिनिटे ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

2 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

2 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

4 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

5 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

5 तास ago