आरोग्य

हाडांना मिळणार बळकटी-दातही राहतील मजबूत, फक्त न चुकता खा कॅल्शियमयुक्त ५ पदार्थ

हाडे हे शरीराचा सर्वात महत्वाचा भाग. हाडांशिवाय शरीराची कल्पनाही करता येत नाही. आपले संपूर्ण शरीर हाडांच्या संरचनेवर अवलंबून असते. पण वयानुसार हाडं ठिसूळ होतात. ज्यामुळे हाडं कमकुवत तर होतातच, शिवाय गुडघे, कंबर, पाठ दुखण्याची समस्या वाढते. हाडे कॅल्शियम (Calcium), फॉस्फेट आणि इतर खनिजे साठवतात. जेव्हा शरीराला त्यांची गरज असते तेव्हा ते रिलीज करतात.

मुख्य म्हणजे मासिक पाळी, डिलिव्हरी, ब्रेस्‍टफीडिंगमुळे महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते. हाडांसह दातांना देखील कॅल्शियमची गरज असते.

जर आपल्याला आहारातून कॅल्शियम हवे असेल तर, आजपासून डाएटमध्ये ५ पदार्थांचा समावेश करा

महिलांना मासिक पाळी, गर्भधारणा, स्तनपान आणि रजोनिवृत्ती अशा अनेक नैसर्गिक प्रक्रियेतून जावे लागते. अशा स्थितीत कॅल्शियमयुक्त पदार्थ खायला हवे. मेनोपॉजनंतर महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते. कमी वयात हाडं ठिसूळ होतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कॅल्शियमयुक्त पदार्थ खाण्याची अधिक आवश्यकता आहे. कारण त्यांना वयाबरोबर हाडांच्या समस्यांचा त्रास जास्त होतो.

दूध: दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे दूध रोज प्यावे. एक ग्लास दुधात ३०० ग्रॅम कॅल्शियम असते. आपण दुधाऐवजी दुग्धजन्य पदार्थही खाऊ शकता. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. शिवाय त्यातून शरीराला इतरही फायदे मिळतात.

अंजीर: अंजीर कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. त्यात फॉस्फरस देखील असते. जे हाडांच्या विकासासाठी मदत करते. एक कप अंजीर खाल्ल्याने शरीराला अंदाजे २४० मिलीग्राम कॅल्शियम मिळते. याशिवाय यात व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम देखील असते. दररोज रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित समस्याही दूर होते.

टोमॅटो: टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के असते, जे कॅल्शियमचे उत्तम स्रोत मानले जाते. त्यामुळे आहारात टोमॅटोचा नक्कीच समावेश करा. टोमॅटो केवळ हाडे मजबूत करत नाही तर, शरीरातील कॅल्शियमची कमतरता देखील भरून काढते.

पालक: पालकमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. १०० ग्रॅम पालकामध्ये ९९ मिलीग्राम कॅल्शियम असते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान ३ वेळा पालक खा. हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने आपली हाडे मजबूत होतात.

सोयाबीन: सोयाबीनमध्ये दुधाइतकेच कॅल्शियम असते. त्यामुळे दुधाला पर्याय म्हणून आपण नियमित सोयाबीन खाऊ शकता. ज्यांना दररोज दूध प्यायला जमत नाही किंवा ज्यांना दूध आवडत नाही, त्या महिलांनी न चुकता सोयाबीन खावे. यामुळे हाडे कमकुवत होणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

8 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

8 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

9 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

24 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago