आरोग्य

हात आणि पायांच्या बोटांना सूज येते वेदना होतात मग ही लक्षणे असू शकतात

थंडीत बहुतेक लोकांच्या हात आणि पायांची बोटे दुखतात. या वेदनेकडे दुर्लक्ष केले जाते, पण जर ही समस्या दीर्घकाळ राहिली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण, छोटीशी समस्या कधी कधी मोठ्या आणि महागड्या समस्येमध्ये बदलू शकते. त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. हात-पायांच्या बोटांच्या वेदनांना हे लागू होते. या वेदना कधी कधी काही गंभीर आजारांचे लक्षण असू शकतात.

तम्ही या वेदनेला सामान्य म्हणून दुर्लक्ष करू नका, कारण कधी कधी ही समस्या तुम्हाला मोठ्या संकटात पाडू शकतात. त्यामुळे हात-पायांच्या बोटांच्या वेदना कोणत्या प्रकारच्या आजारांची सूचक असू शकतात.

वात (Arthritis): हात आणि पायांची बोटे वातामुळे दुखू शकतात. वातामुळे आणि ऑस्टिओआर्थ्राइटिसमुळे बोटांना जडपण येणे, सूज येणे, आणि बोटे लाल होणे यासारखी समस्या होऊ शकते. रक्ताचा संचार थांबल्यामुळे या समस्येची तीव्रता वाढते.

मधुमेह: मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्येही हात आणि पायांच्या बोटांमध्ये वेदना होतात. याशिवाय, बोटे जड होणे, सूज येणे इत्यादी समस्या देखील येऊ शकतात. ही समस्या मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये सर्रासपणे दिसते

संसर्ग: संसर्गामुळेही हात आणि पायांच्या बोटांमध्ये वेदना होऊ शकतात. बोट कापण्यामुळे किंवा इन्फेक्शन झाल्यास बोटाल सूज येणे, लाल होणे आणि वेदना होणे अशी समस्या निर्माण होऊ शकते.

गॅन्ग्लियन सिस्ट: गॅन्ग्लियन सिस्टमुळे हाताच्या बोटात आणि कंबरेत गाठी निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण ही समस्या वाढू शकते.

कार्पल टनल सिंड्रोम: कार्पल टनल सिंड्रोम ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा नसं ताणले जातात किंवा सूज येते, तेव्हा बोटांमध्ये वेदना होऊ शकते. ही वेदना बोटांपासून सुरू होऊन हातापर्यंत पोहोचू शकते. याशिवाय, पायांच्या बोटांमध्ये वेदना, सूज आणि लाल होणे देखील दिसू शकते. जर तुम्हाला यापैकी काही लक्षणे दिसत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago