आरोग्य

चिमूटभर हळद घेऊन ‘या’ पद्धतीने ब्रश करा- दातांना किड लागणार नाही

आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्टचा शोध मागील काही दशकांमध्ये लागला आहे. त्यापूर्वी कडुलिंबाची काडी किंवा त्यासारख्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करूनच दात स्वच्छ केले जायचे. पण नंतर मात्र टूथपेस्टचा शोध लागला आणि हे घरगुती नैसर्गिक उपाय आपण विसरून गेलो. महागड्या टूथपेस्ट आणूनही दातांच्या कित्येक समस्या कमी होतीलच असे नाही म्हणूनच तज्ज्ञांनी असा काही उपाय सुचवला आहे जो आपण घरच्याघरी करू शकतो आणि त्यामुळे दातांचं दुखणं, हिरड्यांचं दुखणं, दाताला कीड लागणे, दात पिवळे होणे, असे अनेक त्रास कमी होऊ शकतात.

दात आणि तोंडाचे विकार होऊ नये म्हणून घरगुती उपाय 

दात आणि तोंडाचे कोणतेही विकार होऊ नयेत यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो.

दाट, लांब केसांसाठी मृणाल ठाकूर करते ‘हा’ उपाय- म्हणते माझ्या केसांना एक्सटेंशनची गरजच नाही.

हा उपाय करण्यासाठी तुमच्या तळहातावर २ चिमूट हळद घ्या. त्यामध्ये १ चिमूटभर मीठ घाला आणि मोहरीच्या तेलाचे ५ ते ६ थेंब घाला. त्यावर १ ते २ थेंब लिंबाचा रस घाला. आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि ते तुमच्या टूथब्रशला लावून त्याने दात घासा.

दात अतिशय स्वच्छ निघतात. तसेच तोंडाची दुर्गंधी कमी होते. काही दिवस हा घरगुती उपाय करून पाहिला तर महागड्या टूथपेस्ट ऐवजी तुम्हाला हाच उपाय आवडू लागेल.

अगदी रोज जरी हा उपाय करणं शक्य झालं नाही तरी आठवड्यातून ३ ते ४ वेळा या पद्धतीने ब्रश करा. लहान मुलांनाही तशी सवय लावा जेणेकरून त्यांचं दातही किडणार नाहीत. मजबूत राहतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

13 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago